मुंबई : पावसाळ्याच्या हंगाम सुरू झाला की डासांचंही (mosquitoes in house) आगमन होतं. तसं तर अनेक ठिकाणी हिवाळा असो, उन्हाळा किंवा पावसाळा नेहमी डासांचा (Machchar) वावर असतो. अशा ठिकाणी ते वर्षभर लोकांना त्रास देतात आणि त्यांची झोप उडवत असतात. घरात लहान मुलं असेल तर अशावेळी डासांपासून त्यांचं रक्षण (Das hakalnyache upay) करण्यासाठी अधिकची काळझी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत लोक डासांना घरातून हकलण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या अनेक वस्तूंचा वापर करतात. मात्र तरीही डासांवर त्यांचा तेवढासा परिणाम होत नाही. त्यामुळं जर तुम्हालाही डासांच्या त्रासापासून मुक्तता हवी असेल तर आम्ही आपल्यासाठी काही उपाय घेऊन आलो आहोत. हे उपाय केल्यानंतर डास घरातून निघून जातीलच (Machchar hakalnyache upay) शिवाय ते परत तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते (mosquitoes solution) उपाय….

दालचिनी : डासांना दालचिनीचा सुगंध अजिबात आवडत नाही. दालचिनीमध्ये सिनानेल्डीहाइड व सिनेमाइल अ‍ॅसीटेटसारखे अनेक घटक असतात जे डासांना दूर ठेवतात. तुम्ही दालचिनी तेलाचे काही थेंब एका स्प्रेच्या बाटलीत घाला आणि आणि ती बाडली पाण्याने भरा. हा स्प्रे शरीराच्या ज्या भागात डास जास्त चावतात त्या ठिकाणी वापरा. यामुळं डास तुमच्या आसपास भटकणार नाहीत.

लिंबाचे तेल : लिंबाचे तेल डासांना दूर करण्यासाठी महत्त्वाचे काम करते. यासाठी लिंबाच्या तेलाचे 10 थेंब 30 मिलीलीटर पाण्यात मिसळून शरीराच्या अशा भांगावर लावा जिथे डास जास्त चावतात. यामुळं तुम्ही रात्री झोपल्यानंतर डास चावणार नाहीत आणि आसपास देखील भटकणार नाहीत.

लसूण : लसणाच्या गंधामुळं डास दूर पळतात. यासाठी लसणाच्या काही पाकळ्या एक चमचा तेलात भिजू घाला आणि रात्रभर तसेच ठेवा. त्यानंतर या तेलात एक चमचा लिंबू आणि 2 कप पाणी घाला. हे मिश्रण एका स्प्रे बाटलीमध्ये घालून घरात असलेल्या रोपांवर शिंपडा. यामुळं रोपांवर बसणारे डास घरापासून दूर निघून जातील.

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा : 1 कप व्हिनेगरमध्ये 1/4 कप बेकिंग सोडा मिसळा आणि एका स्प्रे बाटलीत बंद करा. हे मिश्रण खोलीच्या बाहेर शिंपडा. यामुळं डास घरापासून दूर राहतील.