मुंबई : अनेकांना सतत तोंड (Mouth Ulcer) येण्याची समस्या त्रास देत असते. या समस्येत तोंडात फोड येणे (Tond Yene) किंवा तोंडाच्या आतील त्वचेला इजा होणे असा त्रास होतो. अशा वेळी काही खाणे तर सोडाच पण पाणी पिण्यास देखील खूप त्रास होतो. तोंडात आल्यानंतर (Mouth Ulcer) बोलतानाही खूप त्रास होतो. ही समस्या अनेकांना काही कालावधीनंतर वारंवार त्रास देत असते. यामुळे अनेक जण त्रस्त असतात. असंतुलित आहार, अपचन, पोट सतत खराब होणे, मसाल्याच्या पदार्थ्यांचे सतत सेवन किंवा अॅसिडिटी वाढवणाऱ्या पदार्थांचे वारंवार सेवन यामुळे तोंडात येण्याची (Tond Yene) समस्या उद्भवत असते. त्यामुळं आज आम्ही तुम्हाला तोंडात आल्यास काय करावे (tond yene upay) याविषयी माहिती देणार आहोत.

तोंड येण्यामागचे कारण काय? (Mouth Ulcer Reason)

 • शरिरात लोह आणि व्हिटॅमिन बी यांचं संतुलन नसणे.
 • अति प्रमाणात अतिप्रमाणात तिखट, तेलकट व मसाल्याच्या पदार्थांचे सेवन करणे.
 • अॅसिडिटी वाढवणाऱ्या पदार्थांचे सतत सेवन करणे.
 • अपचन होण्याची वारंवारं तक्रार असल्यास तोंड येते.
 • अति प्रमाणात चहा, कॉफी, तंबाखूचे सेवन, धुम्रपान करणे.
 • दातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे, दात स्वच्छ न ठेवणे.
 • शरीरात अतिरिक्त उष्णता वाढणे.
 • दीर्घकाळ एखादे औषध घेतल्यास त्याचे साईड इफेक्‍ट होऊनही तोंड येते.

काय आहेत घरगुती उपाय ? (Mouth Ulcer Remedy)

 • तुळशीचे दोन ते तीन पाने चावून त्याचा रस प्यावा.
 • ग्लासभर कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ टाकून त्याने गुळण्या करा.
 • जेवणाच्या वेळा पाळाव्यात. रात्रीची झोप व्यवस्थित घ्यावी.
 • लिंबाच्या रसात मध घाला आणि त्याने गुळण्या करा.
 • तोंड आल्यावर जिरे चावून खाल्ल्यानेही फायदा होतो.
 • तोंड आल्यास वाळलेले खोबऱ्याचे तुकडे चावून खा.

अशी घ्या काळजी? (Mouth Ulcer Care)

 • तोडांची नियमित व दिवसातून दोन वेळा योग्य प्रकारे स्वच्छता करा.
 • दात स्वच्छ करण्यासाठी मऊ आणि दर्जेदार ब्रश वापरा.
 • जेवणाच्या वेळा पाळा. नियमित रात्रीची झोप व्यवस्थित घ्या.
 • अति तिखट, तेलकट, मसालेदार आणि अति थंड, अति गरम पदार्थ खाणे टाळा.
 • विटामिन ए, सी आणि ई ने समृध्द असलेले पदार्थ खा.
 • चावण्यास सोपे असतील असे मऊ पदार्थ खा.
 • नियमित दंतांची तपासणी करा. भरपूर पाणी प्या.
 • फास्ट फुड, जंक फुड घेऊ नये. पदार्थ खाऊ नये.