मुंबई : झेंडूच्या फुलांचा (Marigold Flower) वापर मंदिरामध्ये पूजेसाठी आणि घर सजवण्यासाठी केला जातो. या फुलांचा सुगंध खूप छान असतो. झेंडूची फुलं (Marigold Flowers Benifits) त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात हे तुम्ही ऐकलं असेल. पण तुम्ही कधी झेंडूच्या फुलांचा चहा (Marigold Flower Tea) प्यायला आहे का? झेंडूच्या फुलांचा चहा म्हटल्यावर तुम्हाला वाटेल असला चहा असतो का कधी. पण खरंच झेंडूच्या फुलांचा चहा असतो आणि हा चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हाला झेंडूच्या फुलाचा चहा कसा तयार ( How to make Marigold Flower Tea) करायचा आणि त्याचे फायदे सांगणार आहोत. या चहाचे फायदे ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा धक्का बसेल.Also Read - Health Tips : डायबिटीजच्या रुग्णांनी असे करा हळदीचे सेवन, कंट्रोलमध्ये राहिल ब्लड शुगर लेव्हल!

असा तयार करा झेंडूच्या फुलांचा चहा –

झेंडूच्या फुलांचा चहा तयार करण्यासाठी दोन ग्लास पाणी (2 Glass Water) घ्या. पातेल्यामध्ये हे पाणी टाकून ते गॅसवर ठेवा. पाणी उकळत असताना त्यामध्ये झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या टाका. कमीत कमी पाच मिनिटं त्यावर झाकण ठेवा. गॅस बारीक करुन पाणी चांगले उकळू द्या. झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांचा रंग पाण्यामध्ये उतरलेला दिसेल. हे पाणी तोपर्यंत उकळा जोपर्यंत ते अर्धे होत नाही. गॅस बंद करा आणि या पाण्यामध्ये मध (Honey) मिसळा. अशाप्रकारे झेंडूच्या फुलांचा चहा तयार झाला असून तो तुम्ही पिऊ शकता. Also Read - Health Tips : शरीरात साचलेली घाण काही दिवसांत होईल नाहीशी, सकाळी रिकाम्या पोटी प्या हे पेय!

झेंडूच्या फुलांच्या चहाचे फायदे –

– झेंडूच्या फुलांमध्ये अँटी-ऑक्सिडेंट (Anti-oxidant) गुण असतात. ज्यामुळे आपला स्ट्रेस कमी होण्यास मदत (Helps reduce stress) होते. Also Read - Weight Loss Tips : आता वेगात होईल वजन कमी, फक्त रोज रात्री पाण्यामध्ये टाकून प्या ही गोष्ट!

– झेंडूच्या फुलांचा चहा प्यायल्यामुळे अंगाला येणारी सूज, चरबी आणि डायबिटीज (fat and diabetes) कंट्रोल केले जाऊ शकते.

– झेंडूच्या फुलांचा चहा प्यायल्यामुळे दात दुखीची समस्या दूर होते. यासाठी झेंडूचा चहा थोडासा थंड करा आणि त्याने गुळणा करा.

– झेंडूच्या फुलांचा चहा प्यायल्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होतात. चेहऱ्यावर मुरुम आणि पुरळ येण्याच्या समस्यांपासून सुटका होते.