Nana Maharaj Taranekar Death Anniversary: नानांनी वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी केली होती श्रीगुरुचरित्राची कठोर पारायण साधना
Nana Maharaj Taranekar Death Anniversary: दत्तावतारी नाना महाराज तराणेकर (Nana Maharaj Taranekar) यांचे वास्तव्य मध्यप्रदेशातील इंदूर (Indore), उज्जैन (Ujjain) येथे असल्यामुळे यांचा मोठा शिष्यपरिवार आहे. उज्जैन जवळील तराणे (Tarane) या गावी वासुदेव भटजी जोशी (वाघे) या वैदिक ब्राह्मणाच्या कुळात मार्तण्ड शंकर तराणेकर उपाख्य नाना महाराज तराणेकर (Nana Maharaj Taranekar Birthday) यांचा जन्म झाला होता. त्यांचे पूर्वज खान्देशांतील घाटनांद्रा या गावचे होते. वासुदेवानंदसरस्वती यांची कृपा या घराण्यावर होती. वडिलांच्या संगतीत त्यांनी उपासना सुरू केली. नानांनी गुरुचरित्राचे पारायण बालवयातच केले. दत्ताचे लाडके लेकरू म्हणून लोक यांना ओळखू लागले.

Nana Maharaj Taranekar Death Anniversary: दत्तावतारी मार्तण्ड शंकर तराणेकर उपाख्य नाना महाराज तराणेकर ( 18 ऑगस्ट 1896, तराणा, मध्यप्रदेश – मृत्यू: 25 एप्रिल 1993, नागपूर, महाराष्ट्र) (Nana Maharaj Taranekar Birthday) हे दत्त संप्रदायातील (Datta Sambraday) एक संत होते. नाना महाराज (Nana Maharaj) हे वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) महाराज यांच्या अनुग्रहित शिष्यांपैकी एक होते. नाना महाराजांची आज पुण्यतिथी आहे. नाना महाराजांची दत्तप्रभूंवर मोठी निष्ठा होती.
Also Read:
मध्यप्रदेशांतील उज्जैन जवळील तराणे या गावी नाना महाराजांचा जन्म शंकरशास्त्री आणि लक्ष्मीबाई या वैदिक ब्राह्मण दाम्पत्याच्या घरात झाला. शंकर शास्त्री याना वासुदेवानंद सरस्वती यांचा अनुग्रह प्राप्त झालेला असल्याने भक्ती मार्गाची परंपरा नानाच्या घराण्यात पिढीजातच होती. गुरु परमपूज्य गुळवणी महाराजांचा नानांवर मोठा प्रभाव होता. वासुदेवानंद सरस्वती यांनी त्यांना गुरुमंत्र दिला होता.
वयाच्या 13 व्या वर्षी श्रीगुरुचरित्राची कठोर पारायणसाधना…
नाना महाराजांनी वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी श्रीगुरुचरित्राची कठोर पारायणसाधना केली होती. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींकडून नानांनी गुरूमंत्राची दिक्षा मिळवली. अखंड गुरूमंत्राच्या जपाने ते तेजःपुंज बनले. टेंबे स्वामींकडून नर्मदा परिक्रमेची आज्ञा घेऊन त्यांनी परिक्रमाही पूर्ण केली. या परिक्रमेत त्यांना देवदेवतांची अनेक दिव्य दर्शने घडली. त्यानंतर त्यांनी भारतभर तीर्थक्षेत्र दर्शनासाठी भ्रमंती केली. बद्रीनाथ, केदारनाथ येथे श्री शिवदर्शन घेतल्यावर त्यांनी नगराज हिमालयात जाण्याचा निर्धार केला. हिमालयाची यात्रा करताना देखील त्यांना अनेक दिव्य अनुभव लाभले.
नाना महाराज हिमालयात भ्रमंती करत असताना एके दिवशी एका ठिकाणी त्यांना एक गुहा दिसली. गुहेत थोडा विश्राम करावा, या उद्देशाने ते गुहेजवळ थांबले. परंतु गुहेच्या मुखाशी त्यांना दोन वाघ दिसले. वाघ नाना महाराजांना पाहाताच गुरगुरू लागले. गुहेत एक 7-8 फुट उंच, गोरेपान, तेजस्वी योगी समाधी लावून बसले होते. या योग्याने त्या दोन्ही वाघांना, नाना महाराजांना आतमध्ये येऊ देण्याची आज्ञा केली. वाघ शांत झाले. योग्याने नाना महाराजांना जवळ बोलावले. महाराज आत गेले. योगी व महाराज यांच्यात बरेच बोलणे झाले. योग्याने महाराजांना योगसाधनेतील अनेक गोष्टी सांगितल्या. योगाचे अनेक प्रकारही शिकवले. त्याचबरोबर, आपण महाभारत काळापासून समाधी लावून बसल्याचे व साक्षात भगवान श्रीकृष्णाने आपल्याला दिक्षा देऊन योगसाधनेचा आदेश दिल्याचे सांगितले. नंतर योग्याने महाराजांना पुढील प्रवासाबद्दल विचारले. महाराजांनी आपल्याला गंगातटी गंगा नदीचे दर्शन घ्यायला जायचे असल्याबद्दल सांगितले. तेव्हा योग्याने त्यांना आपले (म्हणजे त्या योग्याचे) पाय पकडून डोळे घट्ट मिटून घेण्यास सांगितले. “मी सांगितल्याशिवाय डोळे उघडू नको अन्यथा कोठेतरी मधेच पर्वतांमध्ये पडशील, असे सांगितले. त्याप्रमाणे नाना महाराजांनी त्या योग्याचे पाय पकडले व डोळे घट्ट मिटून घेतले. काही क्षणांनी योग्याने डोळे उघडण्यास सांगितले, त्याप्रमाणे महाराजांनी डोळे उघडताच ते गंगा नदीच्या घाटावर उभे होते. योगी त्यांना तिथे सोडून केव्हाच अदृष्य झाले होते.
(साभार: www.dattamaharaj.com)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या