मुंबई : श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला नारळी ( Narali Purnima 2021) पौर्णिमा म्हणतात. याच दिवशी भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा प्रतिक असलेला रक्षाबंधनाचा (Rakshabandhan 2021) सण देखील साजरा केला जातो. श्रावण महिन्यात येण्याऱ्या पौर्णिमे दक्षिण भारतात नारळी पौर्णिमा ( Narali Purnima 2021)  आणि अवनी अवित्तम म्हणतात, तर मध्य भारतात कजरी पूनम, उत्तर भारतात रक्षाबंधन आणि गुजरातमध्ये पावित्रोपना म्हणून साजरी केली जाते. या वर्षी नारळी पौर्णिमा 22 ऑगस्ट 2021 रोजी साजरी केली जाणार आहे. (Narali Purnima 2021: Narali Purnima to be celebrated on 22nd August; Know Pooja vidhi and shubh muhurta, Rakshabandhan 2021 Pooja rituals and auspicious time)Also Read - Rakshabandhan Shubh Muhurat/Shubh Yog: रक्षाबंधनाच्या दिवसी येत आहे हे शुभ योग; हा असेल राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त

श्रावण पौर्णिमा 2021 वेळ (Narali Purnima 2021 Shubh Muhurta)

श्रावण, शुक्ल पौर्णिमा
प्रारंभ – 21 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 07:00 वाजता
समाप्ती – 22 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 05:31 वाजता Also Read - Raksha Bandhan 2021 Shubh Muhurta: भद्रा मुक्त काळात साजरे करा रक्षाबंधन; जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

या दिवशी करा चंद्राची पूजा

नारळी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रांची पूजा करावी. चंद्राचे दर्शन करावे. दूध गंगाजल आणि अक्षता एकत्र करून चंद्राला अर्घ्य द्यावे.

भगवान लक्ष्मी आणि विष्णूची पूजा

श्रावण पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी-नारायणची शंकरासोबत पूजा केल्याने पुण्य अधिक वाढते अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी महादेवासोबत लक्ष्मी आणि नारायण यांचीही पूजा करावी.

रक्षाबंधन शुभ मुहूर्त: (Rakshabandhan 2021 Muhurta)

रक्षाबंधनाला यावेळी राखी बांधण्यासाठी 12 तास 13 मिनिटांचा शुभ काळ असेल. तुम्ही सकाळी 5.50 ते संध्याकाळी 6.30 पर्यंत कोणत्याही वेळी राखी बांधू शकता. तर 23 ऑगस्ट रोजी सकाळी 5.34 ते सकाळी 6.12 पर्यंत भद्रा काळ राहील. या काळात राखी बांधू नये. (Narali Purnima 2021: Narali Purnima to be celebrated on 22nd August; Know Pooja vidhi and shubh muhurta, Rakshabandhan 2021 Pooja rituals and auspicious time)