Top Recommended Stories

Natural Glow Tips : या 5 गोष्टींचा आहारात करा समावेश, चेहऱ्यावर दिसणार नाही वयाचा प्रभाव, त्वचेवर येईल चमक

Natural Glow Tips: हिवाळ्यात थोडी काळजी घेतल्यास तुम्ही आणि तुमची त्वचा अधिक तरूण दिसू शकते. तुमची त्वचा निस्तेज दिसत असेल आणि चेहऱ्यावरील तेज निघून गेले असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या टिप्स घेऊन आलो आहोत.

Published: January 28, 2022 4:50 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Natural Glow Tips : या 5 गोष्टींचा आहारात करा समावेश, चेहऱ्यावर दिसणार नाही वयाचा प्रभाव, त्वचेवर येईल चमक
Natural Glow Tips

Natural Glow Tips: हिवाळ्यात थोडी काळजी घेतल्यास तुम्ही आणि तुमची त्वचा अधिक तरूण (Young skin) दिसू शकते. तुमची त्वचा निस्तेज दिसत असेल आणि चेहऱ्यावरील तेज (face glow) निघून गेले असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या टिप्स घेऊन आलो आहोत. या टिप्सचा (Skin Care Tips) अवलंब केला तर तुमच्या चेहऱ्यावर तेज तर येईलच शिवाय वाढत्या वयाचे निशाण (Age mark) देखील नाहीसे होतील. चेहऱ्यावर दिसणार्‍या बारीक रेषा, सुरकुत्या, गळू इत्यादी यामुळे नाहिसे होतील. जाणून घेऊया चेहऱ्यावरील वाढत्या वयाचे निशाण कमी करण्यासाठी आणि त्वचा तजेलदार (skin glow Tips) ठेवण्यासाठी काय करावे लागेल….

Also Read:

चमकदादर आणि निरोगी त्वचेसाठी आहारात या गोष्टींचा करा समावेश

पालक (Spinach)

You may like to read

हिवाळ्यात पालक सहज उपलब्ध होतो. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात. पालक खाल्ल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि रक्तही वाढते. पालकाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील बारीक रेषा, सुरकुत्या आणि वृद्धत्वाची इतर निशाण अदृश्य होतील.

टमाटर (Tomatoes)

टोमॅटोमध्ये टोमॅटो सीसह अनेक आरोग्यदायी गोष्टी असतात. रोज टोमॅटोची कोशिंबीर, चटणी, भाजी, सूप इत्यादी खावे. यामुळे तुम्हाला नैसर्गिक चमक मिळेल आणि पोटाचे आरोग्यही चांगले राहील. टोमॅटोमुळं शरीरात पांढऱ्या रक्त पेशींची निर्मिती वेगाने होते. त्यामुळे आजाराशी लढण्याची ताकदही मिळेल.

गाजर (Carrots)

गाजर व्हिटॅमिन ए, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात. गाजर खाल्ल्याने त्वचेचे आरोग्य चांगले राहते आणि पिगमेंटेशन कमी होते. गाजरामुळे त्वचेच्या पेशी खूप लवकर दुरुस्त होतात आणि त्वचा टोन्ड दिसते. गाजरामध्ये बीटा-कॅरोटीन देखील असते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयोगी ठरते.

सफरचंद (Apples)

जे लोक रोज एक सफरचंद खातात ते डॉक्टर पासून दूर राहतात असे तुम्ही ऐकलेच असेल. सफरचंद तुमच्या त्वचेसाठीही तितकेच फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ए, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरने समृद्ध असलेले हे फळ तुमच्या संपूर्ण शरीराच्या आरोग्यावर परिणाम करते. विशेषत: तुमच्या त्वचेवर वाढत्या वयाचे निशाण गडद होऊ देत नाहीत. सफरचंद त्वचेला हायड्रेट ठेवते आणि त्वचेवर चमक आणते.

संतरा (Orange)

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच संत्र्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेचे डागही स्वच्छ करतात. संत्र्याच्या सेवनाने त्वचा हायड्रेटेड राहते आणि त्वचेच्या कोणत्याही समस्या जसे की खाज सुटणे, लाल ठिपके इत्यादी उद्भवत नाही.

बीटरूट (Beetroot)

बीटरूट हे फळ आणि भाजी दोन्ही आहे. तुम्ही भाजी आणि सॅलड म्हणूनही याचा वापर करू शकता. बीटरूट रोज खावे. यामुळे तुम्हाला तुमच्या त्वचेवर लवकरच फरक दिसेल. यामुळे तुमच्या त्वचेचा रंगही साफ होईल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.