आजपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. मंदिरांमध्ये भाविकांना सकाळपासूनच गर्दी केली आहे. भारतीय परंपरेत घटस्थापनेला खूप महत्त्व आहे. यंदाच्या नवरात्रौत्सवानिमित्त आम्ही आपल्याला अशाच एका प्राचीन मंदिराविषयी माहिती घेऊन आलो आहे. हे मंदिर असं आहे की, तिथे शीर नसलेल्या देवीची प्रतिष्ठापना केली जाते. देवीचं मंदिर ऐतिहासिक असून त्याचा अतिशय रंजक इतिहास आहे. ब्रिटिश राजवटीत मंदिरात एक अनोखी घटना घडली होती. तेव्हापासून येथे शीर नसलेल्या देवीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा कायम आहे.Also Read - Breaking News Live Updates: जम्मू-काश्मीर पोलिसांकडून अलर्ट जारी, गैर काश्मीरी मजुरांना सुरक्षा छावणीत हलवण्याच्या सूचना

उत्तर प्रदेशातील झांसी (Jhansi) शहरात देवीचं प्राचीन मंदिर आहे. मंदिरात कालिका देवीची मूर्ती आहे. विशेष म्हणजे देवीला शीर नाही. केवळ देवीच्या धडाची पूजा केली जाते. भाविक मंदिरात मोठी गर्दी करतात. नवरात्रौत्सवात देवीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. परिसरातील नागरिकांमध्ये कालिका देवी प्रति अपार श्रद्धा आहे. Also Read - Breaking News Live Updates: पंजाबमधील शेतकरी अस्वस्थ होऊ देऊ नका, शरद पवारांचा केंद्राला इशारा

झांसीसह परिसरात ‘नीम वाली छिन्नमस्ता माता’ या नावानं कालिका देवीचं मंदिर प्रसिद्ध आहे. देवीला शीर नाही. देवीची मूर्ती अतिप्राचीन आहे. परिसरातील नागरिकांनी देवीची मूर्ती पूर्ण करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. परंतु सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. भाविकांनी देवीच्या धडावर शीर बसवलं पण ते देवीला मान्य नाही, असं लोक सांगतात. नंतर स्थानिक लोकांनी देवीचा श्रृंगार करण्यासाठी मेनाचं शीर बनवलं. आश्चर्याची बाब म्हणजे ते देवीनं स्विकारलं. मात्र, अनेकदा तर देवीचं शीर दिसत नाही. Also Read - Breaking News Live Updates: डॉ. मनमोहन सिंह यांची प्रकृत्ती स्थिर, AIIMS प्रशासनाने दिली माहिती

काय सांगतात जाणकार?

येथील कालिका देवीच्या मंदिराबाबत जाणकार सांगतात की, ब्रिटिश राजवटीत कालिका देवीची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली होती. झांसीमध्ये रेल्वे स्टेशनच्या निर्मितीचं काम सुरू होतं. शहरातील सार्वजनिक जमीन ब्रिटिशांनी अधिग्रहीत केली होती. त्यात एका पटागंणाचा समावेश होता.

पटागंणावर एक निंबाचं झाड होतं. ते तोडण्यात आलं होतं. त्या जागेवर एक भिंत बांधण्यात आलं. परंतु भिंत काही दिवसांतच पडली. अनेकदा भिंत बांधण्यात आली. पण ती टिकतच नव्हती. अखेर ब्रिटिश प्रशासनानं त्या जागेवर खोदकाम केलं. तिथं कालिका देवीची मूर्ती सापडली. मूर्तीला शीर नव्हतं. नंतर स्थानिक लोकांनी त्याच पटांगणावर मूर्तीची प्रतिष्ठापना केली. आता देवीचं भव्य मंदिर आहे.

विशेष म्हणजे नवरात्रौत्सवात कालिका देवीचा श्रृंगार करण्यासाठी मेनाचं शीर बसवलं जातं. त्यानंतर शीर काढण्यात येत आणि केवळ देवीच्या धडाची पूजा केली जाते. ‘बिना सीर वाली काली मां’, म्हणून देवीची मंदिर प्रसिद्ध आहे.