मुंबई : भारतात कोरोना साथ रोगाच्या (covid-19 pandemic) दुसऱ्या लाटेमुळे मोठ्या प्रमाणात लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या लाटेत लहान मुलांसह (children) तरुणांना (Young people) देखील कोरोनाची लागण झाली. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूंपासून ( corona virus) स्वत:चे रक्षण करायचे असेल तर रोग प्रतिकार शक्ती (Immunity) वाढवणे अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे अनेक जण व्यायाम, योगा आणि आहारातून आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी लोक अनेक पदार्थ्यांचं सेवन करतात. मात्र सर्वाधिक फायदा कशातून होतो हे आज आम्ही तु्म्हाला सांगत आहोत. रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कडुलिंबाची पाने (neem leaves ) सर्वाधिक फायदेशीर ठरतात. कडुलिंबाच्या पानांचा आहारात समावेश केल्यास तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात. कडुलिंबाच्या पानांचं सेवन करण्याची पद्धत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.Also Read - रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाण्याचे फायदे - Rikamya Poti Kadulimbachi Pane khanyache fayde

आयुर्वेदात कडुलिंबाच्या पानांचे अनेक फायदे सांगितले आहेत. तुम्हाला एका आठवड्याहून अधिक काळापासून खोकल्याचा त्रास असेल, तर तुम्ही कडुलिंबाच्या पानांचं सेवन साखर किंवा मिस्रीसोबत करून शकता. यामुळं तुम्हाला खोकल्यापासून आराम मिळेल. Also Read - Weight loss Tips In Marathi: वजन कमी करण्यासाठी प्या हा काढा, सर्वात प्रभावी घरगुती उपाय

कडुलिंबाच्या पानांचा वापर मुख्यत्वे रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी करण्यात येतो. कडुलिंबाची पानं हे एक जबरदस्त इम्यूनिटी बूस्टर (Immunity Booster) मानलं जातं. यामध्ये 130 हून अधिक बायोलॉजिकल कम्पाउंड (Biological Compounds) असतात आणि हे तुमची रोग प्रतिकार शक्ती उत्तम ठेवण्याचे काम करतात. Also Read - कोरोनापासून वाचण्यासाठी कडुलिंबांच्या पानांचा आहारात करा समावेश; स्ट्ऱॉंग होईल इम्यूनिटी

कडुलिंबाच्या पानांचा वापर केवळ रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठीच होतो असे नाही. यामुळं इतरही अनेक आजारांपासून तुम्ही दुर राहु शकता. तु्म्ही डायबिटीजचे पेशंट असाल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पानांचं सेवन केल्यास (Benefits of eating neem leaves with empty stomach) तुम्हाला डायबिटीजच्या त्रासापासून आराम मिळू शकतो.

आयुर्वेदाच्या अभ्यासकांनुसार (Ayurvedic practitioners) कडुलिंबाच्या छोट्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. यामुळं शरीरातील रक्त शुद्ध (Blood Purifier) होण्यासाठी त्यांचा फायदा होतो. तसंच या पानांच्या सेवनाने चेरहऱ्यावर तेज येण्यास मदत होते.