Omicronची ही आहेत 5 धोकादायक लक्षणे, चुकूनही दुर्लक्ष करू नका!

ओमिक्रॉन व्हेरिएंटमध्ये अशी अनेक लक्षणं दिसत आहेत जे या आधी कधीच दिसले नाहीत.

Updated: January 9, 2022 1:50 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Omicron Symptoms
Omicron Symptoms

Omicron Symptoms: देशात पुन्हा एकदा कोरोनाने (Corona Virus) डोकं वर काढले आहे. कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यात आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट (Corona New Variant) ओमिक्रॉनची (Omicron) भर पडली आहे. ओमिक्रॉनच्या रुग्णांची (Omicron Patient) संख्या देखील झपाट्याने वाढत चालली आहे. एका महिन्यामध्ये ओमिक्रॉनने संपूर्ण जगाला आपल्या जाळ्यामध्ये अडकवले आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटमध्ये अशी अनेक लक्षणं दिसत आहेत जे या आधी कधीच दिसले नाहीत. डॉक्टरांच्या मते, ‘ओमिक्रॉनच्या सुरुवातीच्या लक्षणांवर योग्य वेळी लक्ष दिले तर त्यावर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल.’ आज आम्ही तुम्हाला ओमक्रॉनच्या अशा काही लक्षणांबद्दल सांगणार आहोत त्याकडे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत दुर्लक्ष करु नका.

Also Read:

निळी आणि राखाडी नखं (Blue and gray nails) –

हे ओमिक्रॉनच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये दिसून येते. ओमिक्रॉन संक्रमित लोकांच्या रक्तात ऑक्सिजनची कमतरता असते. त्यामुळे त्यांची नखे निळी पडू लागतात. जर तुम्हाला असे काही दिसत असेल तर डॉक्टरांशी संपर्क करा.

त्वचेवर परिणाम (Effects on skin) –

तुमच्या त्वचेवर अचानक डाग पडल्यास किंवा त्वचा, ओठ निळे पडत असल्यास तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधावा.

श्वास घेण्यात अडचण (Difficulty breathing) –

जर तुम्हाला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि छातीत घट्टपणा जाणवत असेल तर अशा परिस्थितीतही डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या.

थकवा आणि अंग दुखी (Fatigue and limb pain) –

जर तुम्हाला नेहमी थकवा जाणवत असेल आणि अंथरुणातून उठताना त्रास होत असेल. याशिवाय कंबरेच्या खालच्या भागात असह्य वेदना होता असतील तर ही लक्षणे ओमिक्रॉनमुळे असू शकतात.

रात्री घाम येणे (Night sweats) –

जर तुम्हाला रात्री झोपताना घाम येत असेल तर हे देखील ओमिक्रॉनचे लक्षण असू शकते. तुम्हाला असा त्रास होत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्या.

ओमिक्रॉनची इतर लक्षणं (Other Symptoms of Omicron) –

– घसा खवखवणे
– वाहणारे नाक आणि अनुनासिक रक्तसंचय
– डोकेदुखी
– थकवा
– शिंकणे
– शरीरातील वेदना
– पाणीदार डोळे
– त्वचेवर लालसर निळे डाग किंवा पुरळ

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 9, 2022 1:43 PM IST

Updated Date: January 9, 2022 1:50 PM IST