Omicron Symptoms In Kids: पालकांनो वेळीच काळजी घ्या! लहान मुलांमध्ये दिसतात ओमिक्रॉनची ही लक्षणं

लहान मुलांना ओमिक्रॉनची लागण झाल्यानंतर कोणती लक्षणं दिसतात हे घ्या जाणून...

Updated: January 6, 2022 3:45 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Omicron Symtoms In Kids

Omicron Symptoms In Kids : देशामध्ये कोरोनाने (Corona Virus) पुन्हा डोकं वर काढले आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये (Corona Patient) दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशामध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट (Corona New Variant) ओमक्रॉने (Omicron) देखील लोकांची धास्ती वाढवली आहे. ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या (Omicron Patient) देखील वाढत आहे. त्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. लहान मुलांना देखील ओमिक्रॉनची बाधा झपाट्याने होत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे याकाळात मुलांची योग्य प्रकारे काळजी घेणे खूपच गरजेचे झाले आहे. लहान मुलांना ओमिक्रॉनची लागण झाल्यानंतर कोणती लक्षणं दिसतात याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत…

Also Read:

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये ताप, घसा खवखवणे, आणि खोकला (Fever, sore throat, and cough) ही लक्षणं दिसून येत आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये ही लक्षणं आढळून येत आहेत. अशामध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉमनबाधित रुग्णांमध्ये मग तो तरुण असो वा लहान मुलं यांच्यापैकी बहुतेक रुग्णांमध्ये अतिशय सौम्य लक्षणं आढळत आहेत. या रुग्णांमध्ये ताप, खोकला, घसा खवखवणे आणि घसा दुखणे (Fever, cough, sore throat and sore throat ) ही लक्षणं दिसून येत आहेत. लहान मुलांमध्ये सुद्धा हिच लक्षणं दिसून येत आहेत.

जर तुमच्या मुलांमध्ये ही लक्षणं दिसून येत असतील तर त्यांना तात्काळ डॉक्टरांकडे (Doctor) घेऊन जा आणि त्यांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार घ्या. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णांच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज (Antibodies) विकसित होतात. याच्यामुळे पुन्हा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. पण लहान मुलांना पुन्हा संसर्ग होण्याचा धोका असतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आतापर्यंत लहान मुलांमध्ये इम्युनिटी जास्त (Immunity is high) असल्यामुळे कोरोनाचा प्रभाव कमी दिसून आला आहे. पण मुलांना कोरोनाची लागण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे.

दरम्यान, कोरोना प्रतिबंध लसीचे (Corona Vaccine) दोन्ही डोस घेऊन सुद्धा अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. अशामध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन हा देखील वेगाने पसरत आहे. ओमिक्रॉन डेल्टा व्हेरिएंटची (Delta Variant) जागा घेत आहे. हा व्हेरिएंट खूप वेगाने पसरत आहे. पण ओमिक्रॉनची लागण झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण देखील कमी दिसून येत आहे. तरी सुद्धा सर्वांनी आपली काळजी घेणे महत्वाचे आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 6, 2022 3:44 PM IST

Updated Date: January 6, 2022 3:45 PM IST