Boost Immune System : स्वयंपाकघरातील या 5 गोष्टी वाढवतात रोगप्रतिकारक शक्ती, ओमिक्रॉनपासूनही करू शकतात बचाव
y : देशात पुन्हा एकदा कोविड-19 चे (covid19) रुग्ण वाढू लागले आहेत. अशा परिस्थितीत प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या गोष्टींवर पुन्हा एकदा भर दिला जात आहे. इम्युनिटी बूस्टरच्या (Immunity booster) नावाने बाजारात अनेक गोष्टी विकल्या जात आहे.

How To Increase Immunity : देशात पुन्हा एकदा कोविड-19 चे (covid19) रुग्ण वाढू लागले आहेत. अशा परिस्थितीत प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या गोष्टींवर पुन्हा एकदा भर दिला जात आहे. इम्युनिटी बूस्टरच्या (Immunity booster) नावाने बाजारात अनेक गोष्टी विकल्या जात असल्या तरी येथे आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगत आहोत ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती तर वाढेलच शिवाय कोरोनाचा संसर्गही ( Omicron Verient) टाळता येईल. या सर्व गोष्टी तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतात.
Also Read:
दालचिनी (Cinnamon) : दालचिनीमध्ये औषधी गुणधर्म आढळतात. लोक दालचिनी जेवणात, चहामध्ये किंवा मिठाईत घालून सेवन करतात. याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्तीही वाढते. कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी दलचीनीचे सेवन अत्यंत प्रभावी ठरू शकते.
आवळा (Awla) : आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त त्यात टाटिन देखील असते. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. हे कोणत्याही कारणामुळे शरीरातील आलेल्या हानिकारक विषारी घटकांशी लढण्यास मदत करते.
हळद (Turmeric) : हळदीकडे अँटीबायोटीक म्हणून पाहिले जाते. तुम्ही हळदीचा रोज वापर करत असाल तर ते तुमची रोगप्रतिकारक शक्ती तर वाढवतेच. शिवाय तुम्हाला अशा धोकादायक आजारांपासून वाचवते ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. यामध्ये कर्करोग आणि ट्यूमरचा देखील समावेश आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हळद आरोग्यदायी असते. हळद आपल्या शरीराला संसर्गजन्य रोगांपासून दूर राहण्याची ताकद देते.
आलं (Ginger) : तुम्हाला सामान्य खोकला असला तरी तुम्ही तुमच्या आजीला आलं, गूळ, ओवा आणि तूप घालून चटणी बनवताना पाहिलं असेल. त्यामुळे सर्दी-खोकला काही दिवसांतच मुळापासून संपतो. वास्तविक अदरकमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म आढळतात. मात्र त्याचे जास्त सेवन करणेही धोकादायक ठरू शकते. त्याचा प्रभाव गरम आहे. त्यामुळे याचे सेवन काळजीपूर्वक करावे.
(डिस्क्लेमर : लेखात दिलला मजकूर ही सामान्य माहिती आहे. हे तज्ज्ञांचे मत नाही)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या