Top Recommended Stories

Omicron Symptoms: दुसऱ्यांदा ओमिक्रॉनची लागण होते काय? जाणून घ्या काय सांगतात विशेषज्ज्ञ

ओमिक्रॉनची झपाट्याने लागण होत हा विषाणू अनेकांना बाधित करू शकतो. तज्ज्ञांच्या मते ओमिक्रॉन अशा लोकांना ही प्रभावित करू शकतो, ज्यांना या आधी ओमिक्रॉनची लागण झाली आहे. सध्या असे रुग्ण आढळले नसले भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Published: January 20, 2022 6:10 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

omicron new variant symptoms

Omicron Symptoms: संपूर्ण जगाला हैराण करून सोडणाऱ्या कोविड-19 (Covid-19) नवनवीन व्हेरिएंट समोर येत आहेत. अशातच समोर आलेला ओमिक्रॉन (Omicron variant) व्हेरिएंटमुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडवली आहे. ओमिक्रॉनबाबत नागरिकांमध्ये (Omicron in India) अनेक समज-गैरसमज आहेत. कारण कोरोनावरून सध्या अफवांचेच पीक जास्त आले आहे. ओमिक्रॉनची लागण झालेल्यांना दुसऱ्यांदा या विषाणूंची लागण (Omicron variant can happen again) होते का? हा सवाल अनेकांना पडला आहे. त्यावर विशेषज्ज्ञ काय म्हणतात, हे आपण जाणून घेणार आहोत.

Also Read:

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन अमेरिकेसह संपूर्ण जगभरात पसरला आहे. भारतातही या विषाणूने पाय पसरले आहेत. ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने याआधी ओमिक्रॉनची लागण झालेल्या व्यक्तींच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहे. दुसऱ्यांदा ओमिक्रॉनची लागण होते का ? याबाबात नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे.

You may like to read

संशोधनानुसार, ओमिक्रॉनची झपाट्याने लागण होत हा विषाणू अनेकांना बाधित करू शकतो. तज्ज्ञांच्या मते ओमिक्रॉन अशा लोकांना ही प्रभावित करू शकतो, ज्यांना या आधी ओमिक्रॉनची लागण झाली आहे. सध्या असे रुग्ण आढळले नसले भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की, ओमिक्रॉनची दुसऱ्यांदा लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जॉन्स हॉपकिन्स सेंटर फॉर हेल्थ सिक्युरिटीचे वरिष्ठ अधिकारी डॉ. अमेश अदलजा यांनी केएचओयु 11 ला दिलेल्या माहितीनुसार, अभ्यासक याबाबत शाशंक नाहीत की, ओमिक्रॉन व्हेरियंट लोकांना इम्युनिटी देत आहे. परंतु ओमिक्रॉनमुळे काही व्यक्ती दुसऱ्यांदा संक्रमित होऊ शकतात, असा निष्कर्ष देखील काढण्यात आला आहे.

रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, ओमिक्रॉन व्हेरिएंट कोविड- 19 च्या इतर व्हॅरियंटसाठी प्रतिकार शक्ती प्रदान करतो, असे एका अध्ययनात म्हटले आहे. ओमिक्रॉन व्हॅरिएंट डेल्टाच्या तुलनेत कमी घातक आहे, असा निष्कर्ष विशेषज्ज्ञांनी काढला आहे. मात्र, असे असले तरी नागरिकांनी कोविड- 19 पासून बचावासाठी मास्क नियमित वापरावा. कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या. वारंवार हात धुवावे, सोशल डिस्टन्स पाळा, काळजी घ्या, असा सल्ला विशेषज्ज्ञांनी दिला आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 20, 2022 6:10 PM IST