Top Recommended Stories

Papmochani Ekadashi : पापांपासून मुक्ती मिळविण्यासाठी करा 'हे' व्रत; जाणून घ्या तिथी आणि मुहूर्त

Papmochani Ekadashi : फाल्गुन कृष्ण पक्षात येणाऱ्या या एकादशीला व्रत केल्याने पाप कर्माच्या दंडापासून सुटका होते अशी मान्यता आहे.  28 मार्च म्हणजे  सोमवारी पापमोचनी एकादशी आहे.

Updated: March 25, 2022 9:27 AM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

Papmochani Ekadashi : पापांपासून मुक्ती मिळविण्यासाठी करा 'हे' व्रत; जाणून घ्या तिथी आणि मुहूर्त

Papmochani Ekadashi : पुराणामध्ये (Puran) पापांपासून मुक्ती मिळविण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहे. त्यानुसार पापमोचनी एकादशीचे व्रत (Papmochani Ekadashi vrat)  महत्त्वाचे मानले गेले आहे. फाल्गुन (Falgun mah)  कृष्ण पक्षात येणाऱ्या या एकादशीला व्रत केल्याने पाप कर्माच्या दंडापासून सुटका होते अशी मान्यता आहे.  28 मार्च म्हणजे  सोमवारी पापमोचनी एकादशी (Papmochani Ekadashi) आहे. चलातर मग जाणून घेऊया शुभ मुहूर्त आणि पूजाविधी विषयी…

नावावरूनच या एकादशीचे (Papmochani Ekadashi 2022) महत्त्व लक्षात येते. पापांचा नाशा करणारी ही एकादशी (Ekadashi) 28 मार्च रोजी आहे. त्यानुसार पापमोचनी एकादशी तिथीला 27 मार्च 2022 रोजी सायंकाळी 6:04 वाजेपासून प्रारंभ होईल. तर 28 मार्च 2022 रोजी दुपारी 4:15 वाजता समाप्ती होईल.

You may like to read

अशी करा पूजा

– पापमोचनी एकादशीचे व्रत करायचे असल्यास आदल्या दिवशी सूर्यास्तानंतर भोजन करू नये.
– पापमोचनी एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्ताला उठून लवकर अंघोळ करून व्रताचा संकल्प करावा.
– या दिवशी भगवान विष्णूची (Lord Vishnu) पूजा करून त्यांना प्रसन्न केले जाते.
– त्यामुळे भगवान विष्णू (Lord Vishnu) यांची मूर्ती किंवा प्रतिमेसमोर बसून साजूक तुपाचा दिवा लावावा.
– त्यानंतर भगवान विष्णू यांच्या मंत्राचा जाप करत पूजा करावी. दरम्यान, केळी आणि तुळशीचे नैवेद्य दाखवावे.
– पूजा करताना विष्णू चालिसा (Vishnu Chalisa), विष्णू सहस्त्रनाम (vishnu Sahastranam), पापमोचनी एकादशी पाठ करावा. त्यानंतर भगवान विष्णूची पूजा करावी.
– पूजा झाल्यानंतर प्रसादाचे वाटप करावे आणि स्वतः देखील प्रसाद घ्यावा.
– त्यानंतर ब्राह्मणाला वस्त्र, अन्न, फळ,मिठाई आदी दान करावे.
– व्रताच्या दिवशी फराळ करत रात्री जागरण करावे. व्रताच्या दिवशी नियमांचे पालन करावे.
– दुसऱ्या दिवशी लवकर उठून अंघोळ करून भगवान विष्णूची पूजा करावी. त्यानंतर सायंकाळी पारायण करत व्रत पूर्ण करावा.

(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.