मुंबई: पितृ पक्षाच्या 15 दिवसांमध्ये (Pitru Paksha 2021) पूर्वजांचे श्राद्ध केले जाते. या दिवसांत लोक त्यांच्या पूर्वजांच्या शांतीसाठी प्रार्थना करतात. श्राद्धाचा (Shraddha Paksha 2021) उल्लेखही शास्त्रांमध्ये अनेक ठिकाणी आढळतो. यासोबतच श्राद्धाचे काही नियमही सांगितले गेले आहेत. श्राद्ध करताना हे नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. (Pitru Paksha 2021: Know Who Can Do Shraddha, Here Are The Rules Of Tarpan)Also Read - Pitru Paksha 2021: पितृ पक्षात असे मिळतील पूर्वजांचे आशीर्वाद; कराव्या लागतील या महत्त्वाच्या गोष्टी

श्राद्धाचा उद्देश पूर्ण होण्यासाठी हे नियम जाणून घेणे अत्यंत महत्वाचे

  1. श्रद्धाचा पहिला हक्क ज्येष्ठ पुत्राचा आहे. जर मोठा मुलगा हयात नसेल तर धाकटा मुलगा श्राद्ध करतो.
  2. लग्नानंतर मोठा मुलगा पत्नीसोबत मिळून एकत्र श्राद्ध तर्पण करतो.
  3. ज्याला मुलगा नसेल त्याचे भाऊ आणि पुतणे श्राद्ध करू शकतात.
  4. पित्राला फक्त मुलगी असेल तर तिचा मुलगा श्राद्ध करतो.

श्राद्धा करताना काय करावे आणि काय करू नये

  1. ब्राह्मणांना जेवढे शक्य असेल तेवढे अन्न दान करा.
  2. जर तुम्ही जनुधारी असाल तर पिंड दानाच्या वेळी ते डाव्या ऐवजी उजव्या खांद्यावर ठेवा.
  3. नेहमी सुर्योदयाच्या वेळी पिंडदान करा. पिंड दान सकाळी किंवा अंधारात केले जात नाही.
  4. पिंड दान कांस्य किंवा तांबे किंवा चांदीची भांडी, प्लेट किंवा ताटात करा.
  5. श्राद्धा करताना मुख दक्षिण दिशेला असावे.
  6. श्राद्धाच्या काळात घरात कोणताही कलह नसावा.

अमावस्या श्राद्ध कधी आहे? (When is the Amavasya Shraddha)

पितृ पक्षाची सुरुवात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या तिथीपासून होते आणि आश्विन अमावस्या तिथीला संपते. या वर्षी पितृ पक्ष 20 सप्टेंबर 2021 पासून सुरू होत आहे. शेवटचे श्राद्ध म्हणजेच अमावस्या श्राद्ध (Amavasya Shraddha 2021) 06 ऑक्टोबर 2021 रोजी असेल. (Pitru Paksha 2021: Know Who Can Do Shraddha, Here Are The Rules Of Tarpan) Also Read - Pitru Paksha 2021: स्वप्नात पूर्वज अशाप्रकारे दिसणे मानले जाते अत्यंत अशुभ; असे झाल्यास त्वरित करा हे काम

Also Read - Pitru Paksha 2021: पितृ पक्षात का केले जात नाही शुभ कार्य? जाणून घ्या काय आहे आध्यात्मिक मान्यता