मुंबई: भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून म्हणजेच 20 सप्टेंबरपासून पितृ पक्ष (Pitru Paksha 2021) सुरू झाला आहे आणि 15 दिवस म्हणजेच 6 सप्टेंबरपर्यंत सुरू राहील. या काळात पूर्वजांचे तर्पण (Tarpan) करून त्यांचे आशीर्वाद मिळवता येतात. पूर्वजांचे आशीर्वाद मिळाल्याने आयुष्यात आनंद आणि यश येते. हिंदू धर्मात पितृ पक्षाला (shraddha paksha 2021) खूप महत्त्व आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर श्राद्ध (shraddha vidhi) केले नाही तर त्याच्या आत्म्याला शांती (Peace to soul) मिळत नाही असे मानले जाते. त्यामुळे दरवर्षी पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पितृ पक्षात श्राद्ध (Shraddha in Pitru Paksha) केले जाते. श्राद्ध आणि तर्पणानंतर पूर्वज आनंदी होतात आणि मुलांना आणि कुटुंबाला आशीर्वाद (Ancestor Blessings) देतात. पूर्वजांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांच्याकडून आशीर्वाद मिळवम्यासाठी काही उपाय लक्षात ठेवाणे गरजेचे आहे. (Pitru Paksha 2021: This is how the ancestral blessings will be received in Pitru Paksha; These are important things to do)Also Read - Sarvapitri Amavasya 2021: कधी आहे सर्वपित्री अमावस्या? जाणून घ्या काय आहे महत्त्व

असे मिळेल पूर्वजांचे आशीर्वाद (Blessings of ancestors)

  1. पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी पितृ पक्षात अशा गोष्टी कराव्यात ज्यामुळे त्यांना आनंद आणि समाधान मिळेल. याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊया.
  2. पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी मनापासून दान आणि पुण्य करावे. आपल्या पूर्वजांची श्राद्ध तिथी असेल त्या दिवशी सोने-चांदी, तूप-तेल, मीठ, फळे, मिठाई, गूळ दान करावे.
  3. पितृपक्षाच्या वेळी कावळे आणि मुंग्यांना दररोज खायला द्यावे. असे मानले जाते की आपले पूर्वज कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात.
  4. पितृपक्षात तिळ अतिशय महत्त्वपूर्ण मानले जातात. अशी मान्यता आहे की तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूच्या घामाने झाली आहे.
  5. त्यामुळे त्यांचा श्राद्धात वापर केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती लाभते असे मानले जाते.
  6. जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख माहित नसेल तर काळजी करू नका. अशा स्थितीत सर्व पितृ श्राद्धाच्या दिवशी तुम्ही पूर्वजांचे पिंडदान करू शकता. ही तिथी पितृ पक्षाच्या शेवटच्या दिवशी असते.
  7. लक्षात ठेवा जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांना संतुष्ट ठेवायचे असेल तर श्राद्ध पक्षात कोणतेही शुभ कार्य करू नये. कारण असे केल्याने पूर्वज नाराज होऊ शकतात.
  8. श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीबरोबरच कुटुंबातील सर्व सदस्यांनी स्वतःच्या हाताने दान करावे आणि एखाद्या गरीब व्यक्तीला त्या दिवशी जेवण द्यावे.
  9. श्राद्ध कर्म करताना पूर्वजांकडे आपल्या चुकांबद्दल निश्चितपणे क्षमा मागा.
Also Read - Pitru Paksha 2021: स्वप्नात पूर्वज अशाप्रकारे दिसणे मानले जाते अत्यंत अशुभ; असे झाल्यास त्वरित करा हे काम
Also Read - Pitru Paksha 2021: पितृ पक्षात का केले जात नाही शुभ कार्य? जाणून घ्या काय आहे आध्यात्मिक मान्यता