Plastic Water Bottles: तुम्हीही प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी पीत असाल तर सावधान! होऊ शकतो कर्करोग

Plastic Water Bottles: तुम्हीही प्लास्टिकच्या बाटलीत ठेवलेले पाणी पित असाल तर सावध व्हा! कारण मिनरल वॉटरच्या नावाने तुम्ही जी बाटली मोठ्या अभिमानाने विकत घेता, त्यातून खरंतर कॅन्सरसारख्या अनेक आजारांचा फैलाव होऊ शकतो. हे पाणी हार्मोनल इंबॅलेन्ससाठी देखील कारणीभूत ठरू शकते असे डॉक्टरांचे मत आहे.

Published: April 27, 2022 10:41 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Plastic Water Bottles: तुम्हीही प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी पीत असाल तर सावधान! होऊ शकतो कर्करोग
Plastic Water Bottles

Plastic Water Bottles: यंदा उष्णता मोठ्या प्रमाणआत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे (Heat Wave) प्रत्येक जण हैराण आहे. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता भासते आणि आपल्याला खूप तहान लागते. अशावेळी आपण जिथे पाणी दिसेल तिथे आपली तहान भागवतो. ते पाणी कुठल्या कंटेनरमध्ये ठेवलं आहे हे देखील पाहत नाही. पाणी कोणत्या कंटेनरमध्ये आहे याला खूप महत्त्व आहे. एका रिपोर्टनुसार आपण प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये (Plastic Water Bottles) येणारे पाणी पिणे टाळले पाहिजे. कारण ते खूप धोकादायक असू शकते. हिंदी दैनिक नवभारत टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, या मोठ्या बाटल्या (Water Bottles) अनेक दिवस सूर्यप्रकाशात (Sunlight) राहतात. याशिवाय 1 ते 2 लिटरच्या बाटल्याही जास्त वेळ उन्हात ठेवल्या तर त्याही धोकादायक ठरू शकतात. चला जाणून घेऊया यामागील विज्ञान काय आहे.

Also Read:

संशोधकांनी असे सुचवले आहे की आपण अशा प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिऊ नये, ज्या बऱ्याच काळापासून उन्हात पडलेल्या असतात. उदाहरणार्थ जर तुमची कार दिवसभर कडक उन्हात गरम झाली असेल आणि त्यात पाण्याची बाटली ठेवली असेल तर त्यातील पाणी तुमच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. कारण सूर्यप्रकाशामुळे प्लास्टिकची रसायने पाण्यात विरघळू शकतात. जर तुम्ही गाडीत ठेवलेल्या त्याच प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पित असाल तर सावध राहा. कारण ती बराच काळ उन्हात असते. जास्त तापमान आणि सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहिल्यामुळे प्लास्टिकमध्ये असलेले रसायनही पाण्यात विरघळण्यास अधिक वेळ मिळतो.

हे पाणी तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते

नवभारत टाइम्सने यासंदर्भात डॉ.संदीप गुलाटी यांच्याशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी सांगितले की “जर तुम्ही प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी पित असाल तर मायक्रो प्लास्टिकमुळे तुम्हाला पोटाचा त्रास होऊ शकतो. रिपोर्टनुसार या पाण्यामुळे हार्मोनल इंबॅलेन्स देखील होऊ शकते, ज्यामुळे PCOS, गर्भाशयाशी संबंधित समस्या, स्तनाचा कर्करोग, कोलन कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग आणि इतर अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.

प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणी पिण्याचे तोटे

  1. थेट सूर्यप्रकाशामुळे प्लास्टिकमधून एक विष बाहेर पडते. त्याला डायऑक्सिन म्हणतात. ते पिल्याने स्तनाच्या कर्करोगाचा (Breast Cancer) धोका वाढतो.
  2. बायफिनालय-ए हे एक रसायन आहे जे इस्ट्रोजेनची नक्कल करते, यामुळे मधुमेह (Diabetes), लठ्ठपणा (Obesity), वंध्यत्व समस्या (Fertility Problems), वर्तणुकीशी संबंधित समस्या आणि मुलींमध्ये लवकर तारुण्य (Early puberty in girls) येऊ शकते. त्यामुळे प्लॅस्टिकच्या बाटलीत पाणी साठवू नका किंवा ते वापरु नका.
  3. प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिल्याने आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर (Immune System) वाईट परिणाम होतो. प्लास्टिकच्या बाटलीतून बाहेर पडणारे रसायन पचत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या शरीराच्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीवर होतो.
  4. प्लास्टिकमध्ये फॅलेट नावाचे रसायन असते. त्यामुळे प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी प्यायल्याने यकृताचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो आणि पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या (Sperm Count) कमी होऊ शकते. याचा थेट त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.
  5. न्यूयॉर्कच्या फ्रेडोनियो येथील स्टेट युनिव्हर्सिटीने नुकत्याच केलेल्या संशोधनात बाटलीबंद पाण्यात मायक्रोप्लास्टिक्सचे प्रमाण खूप जास्त असल्याचे समोर आले आहे. विशेषतः प्रसिद्ध ब्रँडच्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये हे प्रमाण जास्त असते. हे लक्षात घ्या की मायक्रोप्लास्टिक प्लास्टिकच्या अशा छोट्या तुकड्यांना म्हटले जाते जे डोळ्यांना सहज दिसत नाहीत आणि ते 5 एमएम किंवा त्याहून लहान असतात.
  6. संशोधनात 93 टक्के पाण्याच्या बाटल्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक आढळले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार मायक्रोप्लास्टिकचा आरोग्यावर वाईट परिणाम होत नसला तरी ही चिंतेची बाब आहे.

पाण्याची बाटली खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी

  1. जास्त वेळ उन्हात ठेवलेल्या पाण्याच्या बाटल्या विकत घेऊ नका.
  2. हे लक्षात ठेवा की प्लास्टिकची बाटली सावलीत ठेवली जाते आणि त्या ठिकाणचे कमाल तापमान 25 डिग्री सेल्सिअस असते.
  3. तुम्ही बाहेर जाल तेव्हा तुमची पाण्याची बाटली सोबत ठेवा आणि ती काचेची किंवा धातूची असेल तर उत्तम.
  4. शक्यतो प्लास्टिकच्या बाटल्या खरेदी करू नका
  5. लक्षात ठेवा की प्लास्टिकची बाटली बनवताना कार्बन फूटप्रिंट देखील खूप होते.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: April 27, 2022 10:41 PM IST