Pradosh Vrat 2022: शनिवारी आहे वर्षातील पहिले प्रदोष व्रत, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
प्रदोष व्रत महिन्यातून दोन वेळा एक कृष्ण पक्षात आणि एक शुक्ल पक्षात येते. चालू वर्षाच्या पहिल्या महिन्यात पहिले प्रदोष व्रत 15 जानेवारी 2022 रोजी येत आहे. या दिवशी शनिवार आहे त्यामुळे त्याला शनि प्रदोष असेही म्हणतात.

Pradosh Vrat 2022 Date and Shubh Muhurt : प्रदोष व्रत महिन्यातून दोन वेळा एक कृष्ण पक्षात आणि एक शुक्ल पक्षात येते. चालू वर्षाच्या पहिल्या महिन्यात पहिले प्रदोष व्रत 15 जानेवारी 2022 रोजी येत आहे. या दिवशी शनिवार आहे त्यामुळे त्याला शनि प्रदोष असेही म्हणतात. प्रदोष व्रताच्या दिवशी प्रभू शंकर आणि त्यांच्या कुटुंबाची पूजा केली जाते. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला येते. 12 महिन्यांत एकूण 24 प्रदोष व्रत केले जातात.
Also Read:
जे लोक दर महिन्याला प्रदोष व्रत करतात त्यांना भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते. प्रदोष व्रत करणाऱ्या लोकांनी प्रदोष काळात भगवान शंकराची पूजा केली तर त्याचे विशेष महत्त्व असते आणि विशेष फळ मिळते अशी मान्यता आहे. प्रदोष व्रताच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि या दिवशी भगवान शंकर आणि त्यांच्या कुटूंबाची पूजा कोणत्या पद्धतीने केली जाते हे जाणून घेऊया…
Pradosh Vrat 2022 Date and Shubh Muhurt: शुभ मुहूर्त
पौष शुक्ल त्रयोदशी कधी सुरू होईल : 14 जानेवारी 2022 रोजी रात्री 10:19 वाजता
पौष शुक्ल त्रयोदशी कधी संपेल : 16 जानेवारी 2022 रोजी सकाळी 12:57 वाजता
प्रदोष काळ कधी सुरू होईल : सायंकाळी 05:46 पासून ते रात्री 08:28 पर्यंत
रवि प्रदोष व्रत कधी असेल : 30 जानेवारी 2022 रोजी
Shani Pradosh Vrat 2022: पूजा विधी
सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करावी.
स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालावे.
भगवान शिव आणि त्यांच्या कुटुंबाच्या प्रतिमेसमोर दिवा लावा.
व्रत करायचे असेल तर व्रताताचा संकल्प घ्या.
भगवान शंकराला गंगाजलाने अभिषेक घाला.
फुले अर्पण करा.
संपूर्ण कुटुंबासह भगवान शंकराची पूजा करा.
प्रसाद अर्पण करा आणि पठण, आरती करा.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या