Pradosh Vrat 2022: जाणून घ्या सोम प्रदोष व्रताचे महत्त्व, चंद्र दोष होईल दूर, शनी-राहू देखील होतील शांत!
Pradosh Vrat 2022: सोमवार (28 फेब्रुवारी) रोजी प्रदोष व्रत (Pradosh Vrat )आहे. फेब्रुवारी 2022 महिन्यातील हा शेवटचा प्रदोष व्रत (Pradosh Vrat 2022) असून या दिवशी फाल्गुन माघची कृष्ण पक्ष त्रयोदशी तिथी आहे. त्यानुसार हा फाल्गुन माघचा (Phalgun Magh) पहिला प्रदोष व्रत आहे. या दिवाशी सोमवार असल्याने हा सोम प्रदोष व्रत (Som Pradosh Vrat) आहे. व्रत ठेवत विधीवत शिव पूजन केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.

Pradosh Vrat 2022: फेब्रुवारी माहिन्यातील शेवटचे प्रदोष व्रत आज सोमवारी आहे. त्यामुळे याला सोम प्रदोष व्रत (Som Pradosh Vrat 2022) ) देखील म्हटले जाते. या दिवशी फाल्गुन माघची कृष्ण पक्ष त्रयोदशी तिथी आहे. त्यामुळे हे फाल्गुन महिन्यातील (Phalgun Magh) पहिले प्रदोष व्रत आहे. या दिवशी विधीवत शिव पूजा केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. आज 28 फेब्रुवारी रोजी पहाटे 5:42 मिनिटांनी त्रयोदशी तिथी सुरु होत आहे, ती 1 मार्च रोजी पहाटे 3:16 वाजेपर्यंत असेल. या दिवशी सायंकाळी 6:20 वाजेपासून ते रात्री 8:49 वाजेपर्यंत प्रदोष पूजेचा मुहूर्त आहे. हे व्रत केल्याने रोग आणि ग्रहांचे दोष दूर होतात अशी श्रद्धा आहे. जाणून घेऊया प्रदोष व्रताने चंद्र, शनी आणि राहू दोष कसा दूर होतो.
Also Read:
प्रदोष व्रताने लाभते ग्रहशांती
पौराणिक कथेनुसार श्रापामुळे चंद्र देवाला कुष्ठ रोग झाला होता. त्यामुळे चंद्र देवाचे सौंदर्य, शीतलता आणि प्रभाव क्षीण झाला होता. तेव्हा त्यांनी भगवान शंकराची विधिवत पूजा केली. कठोर तपस्येनंतर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि चंद्र देवाची कुष्ठ रोगापासून सुटका केली होती. शिव पूजेमुळेच चंद्राचे दोष दूर झाले. त्यामुळे प्रदोष व्रत केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार प्रदोष व्रत ठेवल्याने कुंडलीतील चंद्र दोष देखील नाहीसा होतो. एवढेच नाही तरच शनी आणि राहू दोष देखील दूर होतात. पूजेदरम्यान ‘ओम नमः शिवाय’ मंत्राचा जप करावा. आजचे प्रदोष व्रत अधिक लाभदायक आहे. कारण आज सकाळपासूनच ‘सर्वार्थ सिद्धी योग’ आहे. जो पूर्ण रात्रभर राहील. या योगात शिव पूजा केल्याने सर्व कार्य यशस्वी होतात.
प्रदोष व्रताचे महत्व
रवी प्रदोष व्रत – या व्रताने दीर्घायुष्य आणि उत्तम स्वास्थ लाभते.
सोम प्रदोष व्रत – सर्व मनोकामना पूर्ण होतात.
भौम प्रदोष व्रत – असाध्य रोगांपासून मुक्ती मिळते.
बुध प्रदोष व्रत – या दिवशी व्रत केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.
गुरु प्रदोष व्रत – शत्रूंना मात देण्यासाठी या व्रताचे महत्व आहे.
शुक्र प्रदोष व्रत – सुख, समृद्धी आणि आनंदी दांम्पत्य जीवनासाठी हे व्रत केले जाते.
शनी प्रदोष व्रत – हे व्रत पुत्र प्राप्तीसाठी केले जाते अशी पुराणानुसार सर्वसाधारण मान्यता आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या