Top Recommended Stories

Propose Day 2022: नात्याला पुढे घेऊन जायचे असेल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा!

Propose Day 2022: तुम्ही पहिल्यांदाच कोणासमोर आपल्या मनातील प्रेम व्यक्त करत असाल आणि त्या व्यक्तीला लग्नासाठी प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Updated: February 8, 2022 9:01 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

propose day 2022
propose day 2022

Propose Day 2022: तुमचे अरेंज मॅरेज (Arrange Marriage) होणार असेल किंवा लव्ह मॅरेज (Love Marriage). पण जर तुमच्या आयुष्यात एखादी स्पेशल व्यक्ती (Special Person) येत असेल तर त्या व्यक्तीला प्रपोज डेच्या दिवशी (Propose Day 2022) तुमच्या मनात त्या व्यक्तीबद्दल असलेले प्रेम नक्की व्यक्त करा. जर तुम्ही पहिल्यांदाच कोणासमोर आपल्या मनातील प्रेम व्यक्त करत असाल आणि त्या व्यक्तीला लग्नासाठी प्रपोज (Marriage Propose) करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढे तुम्हाला काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही. नात्याला पुढे घेऊन जात असताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे त्या कोणत्या ते आज आपण जाणून घेणार आहोत…

Also Read:

वेळ-जागा निर्धारित करा –

आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीला प्रपोज केल्यानंतर लगेचच लग्न करण्यासाठी उतावळे होऊ नका. जर तुमच्या नात्याला कमी वेळ मिळाला असेल तर लग्नापूर्वी काही महिने आपल्या पार्टनरला समजून घेण्यासाठी त्याच्यासोबत थोडा वेळ घालवणे खूप गरजेचा आहे.

You may like to read

कोणतीही गोष्ट लपवू नका –

आपल्या होणाऱ्या पार्टनरला आपल्या भूतकाळाबद्दल जरुर सांगा आणि त्या व्यक्तीचा देखील भूतकाळ जाणून घ्या. यामुळे पुढे जाऊन काहीच गैरसमज होणार नाही. जर तुमच्या आवडत्या व्यक्तीला तुमच्या भूतकाळामुळे काही समस्या वाटत असेल तर एका चुकीच्या नात्यामध्ये अडकण्यापासून तुमचा बचाव होईल.

आर्थिक भागीदारी –

लग्नापूर्वी आपल्या पार्टनरचा पगार किती आहे हे नक्की जाणून घ्या. तसंच तुमचा सुद्धा पगार किती आहे हे त्याला देखील सांगा. त्याचसोबत आर्थिक गोष्टींबद्दल तुमचे काय विचार आहेत हे जरुर पार्टरनरला सांगा. तुम्ही त्याला हे देखील सांगा की घर खर्चामध्ये तुम्ही किती सहकार्य करु शकाल.

कुटुंबासोबत वेळ घालवा –

तुमच्या होणाऱ्या पार्टनरच्या कुटुंबासोबत थोडा वेळ जरुर घालवा. जर त्यांच्या राहणीमानाचा दर्जा आणि विचार तुमच्या कुटुंबापेक्षा खूपच वेगळे असतील तर तुम्हाला त्यांच्यासोबत अ‍ॅडजस्ट व्हायला त्रास होईल. असे झाले तर तुम्ही विचार करुनच पुढे जा.

तुमच्या इच्छा जरुर सांगा –

तुम्हाला भविष्यात काय करण्याची इच्छा आहे, कशी लाईफस्टाईल ठेवायची आहे, मुलांबाबत काय विचार आहे, कुठे फिरायला जायची इच्छा आहे किंवा काही नवीन काम करण्याची इच्छा असेल तर या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या होणाऱ्या पार्टनरला नक्की सांगा. दोघांचे विचार एकसारखे आणि समान असतील तरच पुढे जाण्याचा विचार करा.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 8, 2022 9:01 AM IST

Updated Date: February 8, 2022 9:01 AM IST