Sesame Oil Benefits: रात्री झोपण्यापूर्वी 'या' तेलाचे दोन थेंब नाभीत टाका, होतील अनेक आश्चर्यकारक फायदे!
Sesame Oil Benefits: नाभीत तेल टाकूनही शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढता येतात. आज आपण नाभीमध्ये तिळाचे तेल टाकल्यामुळे काय फायदे होतात हे जाणून घेणार आहोत.

Sesame Oil Benefits : तिळाचा (Sesame) आपण आपल्या स्वयंपाक घरामध्ये वापर करतो. अनेक पदार्थांची चव वाढवण्यासाठी तिळाचा वापर केला जातो. तीळ खायला चविष्ट असतात. तिळाचे लाडू, तिळाची चिक्की तयार केली जाते. तीळ हे आपल्या आरोग्यासाठी (Beneficial For Health) खूप फायदेशीर असते. ते आपल्या शरीराचे अनेक आजारांपासून संरक्षण करते. हृदयरोगापासून (Heart Attack) ते अनेक आजारांवर तीळ खूप फायदेशीर आहे. तीळासोबतच तिळाचे तेल हे देखील आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे.
Also Read:
आयुर्वेदात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा वापर करून शरीर तर निरोगी राहतेच पण आरोग्याच्या अनेक समस्यांवरही मात करता येते. पूर्वीच्या काळामध्ये लोकं नाभीद्वारे बरे होत होते. नाभीत तेल टाकूनही शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढता येतात. आज आपण नाभीमध्ये तिळाचे तेल (Sesame Oil) टाकल्यामुळे काय फायदे होतात हे जाणून घेणार आहोत. तिळाचे तेल औषधी तत्वांनी परिपूर्ण आहे. अशा परिस्थितीत याचा वापर करून शरीराच्या अनेक समस्यांवर मात करता येते. तिळाचे तेल नाभीमध्ये टाकल्यामुळे नेमके काय फायदे होतात हे आज आपण आयुर्वेद संजीवनी हर्बल क्लिनिक, शकरपूर येथील आयुर्वेदाचार्य डॉ. एम मुफिक यांच्याकडून जाणून घेणार आहोत…
नाभीत तिळाचे तेल टाकण्याचे फायदे –
– सांधेदुखी दूर करण्यासाठी तिळाच्या तेलाचा खूप उपयोग केला जातो. अशा स्थितीत तिळाच्या तेलाचे काही थेंब नाभीमध्ये टाका. असे केल्याने अनेक समस्या दूर होऊ शकतात.
– तिळाचे तेल वात दोष शांत करण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते. अशावेळी नाभीत तिळाचे तेल टाकावे. असे केल्याने वातदोष दूर होऊ शकतो.
— सर्दी आणि खोकला दूर करण्यासाठी तिळाचे तेल तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. अशा स्थितीत नाभीमध्ये नियमितपणे तिळाचे तेल टाकावे. असे केल्याने समस्या दूर होऊ शकते.
– संसर्ग रोखण्यासाठी तिळाचे तेल देखील उपयुक्त आहे. तिळाच्या तेलाने नाभी स्वच्छ करू शकता. असे केल्याने संसर्गाच्या समस्येवर मात करता येते.