Putrada Ekadashi 2022 Date : कधी आहे पौष पुत्रदा एकादशी, जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी

पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करून उपवास केल्याने व्यक्तीला संततीचे वरदान मिळते असे मानले जाते. हिंदू कॅलेंडरनुसार महिन्याच्या दोन्ही पक्षात, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील अकरावा दिवस एकादशी म्हणून साजरी केली जातो.

Published: January 9, 2022 5:15 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Putrada Ekadashi 2022 Date : कधी आहे पौष पुत्रदा एकादशी, जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी
Putrada Ekadashi 2022 Date Know when is Paush Putrada Ekadashi, what is its importance and worship method

Putrada Ekadashi 2022 : पुत्रदा एकादशीच्या (Putrada Ekadashi 2022) दिवशी भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करून उपवास केल्याने व्यक्तीला संततीचे वरदान मिळते असे मानले जाते. हिंदू कॅलेंडरनुसार महिन्याच्या दोन्ही पक्षात, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील अकरावा दिवस एकादशी म्हणून साजरी केली जातो. पुत्रदा एकादशी (Putrada Ekadashi importance) वर्षातून दोन वेळा येते. त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते. पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौष पुत्रदा एकादशी (Paush Putrada Ekadashi 2022)  म्हणून साजरी केली जाते.

Also Read:

पुत्रदा एकादशी तिथी (Putrada Ekadashi Tithi)

पंचांगानुसार यावेळी पौष पुत्रदा एकादशी 13 जानेवारी 2022 रोजी दुपारी 4:49 वाजता (Putrada Ekadashi 2022 Date) सुरू होईल आणि 14 जानेवारीला संध्याकाळी 7.32 वाजता संपेल. हिंदू धर्मात उत्तरायण तिथीला सण साजरे केले जातात. त्यामुळे 13 जानेवारीला पौष पुत्रदा एकादशी साजरी केली जाणार आहे. 14 जानेवारी 2022 रोजी द्वादशीच्या दिवशी व्रत पारण करावे लागेल.

पुत्रदा एकादशीचे महत्त्व (Importance of Putrada Ekadashi)

पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूची विधिवत पूजा करून व्रत केल्यास पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होते अशी श्रद्धा आहे. जे लोक हे व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्री विष्णूची अपार कृपा असते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असेही मानले जाते. जे लोक वर्षातून दोनदा हे व्रत करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या मुलांना आरोग्याचे वरदान मिळते अशी मान्यता आहे.

पुत्रदा एकादशीची पूजा विधी (Putrada Ekadashi Puja Vidhi)

एकादशीच्या व्रताचे नियम दशमीच्या तिथीपासून लागू होतात त्यामुळे दशमीच्या दिवशीही कांदा-लसूण खाऊ नये. द्वादशीला उपवास सोडावा. तुम्हाला एकादशीचे व्रत करायचे असेल (Know when is Paush Putrada Ekadashi, what is its importance and worship method) तर दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भोजन करावे. पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. या दिवशी गंगेत स्नान करण्याचा नियम आहे. पण जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळू शकता. स्नानानंतर भगवान श्री विष्णूची विधीवत पूजा करा. पंचोपचार विधीने भगवान श्री विष्णूची पूजा करून त्यांना धूप, दीप, फुले, अक्षता, रोली, फुलांच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करा आणि व्रताचा संकल्प घ्या. पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचा आणि दिवसभर उपवास ठेवा. रात्री फळे खावीत आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून ब्राह्मणांना खाऊ घालावे आणि स्वतः सेवन करावे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 9, 2022 5:15 PM IST