मुंबई: रक्षाबंधनाचा (Rakshabandhan) सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक मानले जातो. हिंदू धर्मात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रक्षाबंधनाच्या दिवसाची (Rakshabandhan 2021) प्रत्येक भाऊ-बहीण वाट पाहात असतात. राखी आणि भेटवस्तू, मिठाई आणि अशा बऱ्याच गोष्टींची आधीपासून या दिवसासाठी योजना सुरु करतात. बहिणी या दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधतात. यावर्षी 22 ऑगस्ट 2021 रोजी रक्षाबंधन (Raksha Bandhan 2021) सण साजरा केला जाणार आहे. (Auspicious Time For Rakhi)Also Read - Raksha Bandhan 2021: या आहेत बॉलिवूडमधील सर्वात फेमस बहीण-भावांच्या जोड्या, एकदा फोटो बघाच!

राखी बांधण्याची शुभ वेळ (Auspicious Time To Tying Rakhi)

रक्षाबंधन विधीचा वेळ- सकाळी 06:15 ते सायंकाळी 05:31 पर्यंत
रक्षाबंधनासाठी दुपारी वेळ – दुपारी 01:42 ते सायंकाळी 04:18 वाजेपर्यंत
रक्षाबंधन भद्रा समाप्ती वेळ – सायंकाळी 06:15 वाजता
रक्षाबंधन भद्रा पूंछ – पहाटे 02:19 ते पहाटे 03:27 पर्यंत
रक्षाबंधन भद्रा मुख – पहाटे 03:27 ते पहाटे 05:19 पर्यंत
पौर्णिमा तिथीला सुरुवात – 21 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी 07:00 वाजता
पौर्णिमा तिथी संमाप्ती – 22 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 05:31 वाजता Also Read - Raksha Bandhan Gift: भावाला अनोखं गिफ्ट देत वाचवलं प्राण, दोन बहिणींनी आपलं अर्ध-अर्ध यकृत केलं दान!

रक्षाबंधन या वेळी भद्रा मोकळी असेल

रक्षाबंधनाच्या दिवशी अतिशय अशुभ मानली जाणारी शनिदेवाची बहिण भद्रा (Shanideva’s sister Bhadra) दिवसभर नसेल. रक्षाबंधनाचा सण नेहमी भद्रा आणि ग्रहणातून मुक्त झाल्यानंतरच साजरा केला जातो. शास्त्रांमध्ये केवळ भद्रामुक्त काळातच (Bhadramukta Period) राखी बांधण्याची परंपरा आहे. भद्रामुक्त काळात राखी बांधल्याने सौभाग्य वाढते. यावेळी रक्षाबंधनावर भद्राची नजर राहणार नाही. Also Read - Raksha Bandhan Special Movie: बॉलिवूडच्या या चित्रपटात दाखवलंय बहीण-भावांचं अतुट नातं, रक्षाबंधननिमित्त करा एन्जॉय!

अशी बांधा राखी (Raksha Bandhan Vidhi)

राखी बांधण्यासाठी ताट सजवा. त्यात रोली, कुंकू, अक्षता, दिवा, मिठाई आणि राखी ठेवा. राखी बांधण्याआधी भावाला टिळा लावा आणि त्याच्या उजव्या हातावर संरक्षक धागा बांधा. त्यानंतर भावाची आरती ओवाळा. भावाला मिठाई द्या. राखी बांधल्यानंतर बांधवांनी त्यांच्या इच्छेनुसार आणि क्षमतेनुसार बहिणींना भेटवस्तू द्याव्यात. (Raksha Bandhan 2021 Shubh Muhurta: Celebrate Rakshabandhan in Bhadra free time; Know the auspicious Time of tying Rakhi Rakhi Bandhanyachi Yogya Vel Raksha Bandhan Shubh Muhurta)