बहीण-भावाच्या (Sister and Brother) पवित्र नात्याचा उत्सव म्हणजेच रक्षाबंधन (Raksha Bandhan 2021) सण येत्या 22 ऑगस्टला (रविवार) साजरा होणार आहे. प्रत्येक घरात आतापासूनच रक्षाबंधनाची तयारी सुरू झाली आहे. बाजार राख्यांनी सजला (Raksha Bandhan Fesival) आहे. बहिणी आपल्या भाऊरायासाठी राखी तर भाऊ आपल्या बहिणीसाठी गिफ्ट खरेदी करताना दिसत आहे. यंदा आलेला रक्षाबंधन सण ज्योतिषशास्त्रानुसार (Jyotishshashtra) महत्त्वपूर्ण आहे. 22 ऑगस्ट 2021, रविवारी रक्षाबंधन (Raksha Bandhan 2021) आहे. शास्त्रानुसार या दिवशी भद्राकाल नाही. याचा अर्थ असा की, रक्षाबंधनच्या दिवशी बहीण आपल्या भावाला कोणत्याही मुहूर्ताला राखी बांधू शकते.Also Read - Raksha Bandhan 2021: या आहेत बॉलिवूडमधील सर्वात फेमस बहीण-भावांच्या जोड्या, एकदा फोटो बघाच!

ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र हा कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. आणि देवगुरू बृहस्पती आधीपासून कुंभ राशीत विराजमान आहे. चंद्र आणि गुरुच्या युतीनं रक्षाबंधनच्या दिवशी विशेष योग बनला आहे. ज्योतिषशास्त्रात याला ‘गज केसरी’ योग असं देखील संबोधलं जातं. या योगचा काही राशीवर शुभ प्रभाव पडणार आहे. Also Read - Raksha Bandhan Gift: भावाला अनोखं गिफ्ट देत वाचवलं प्राण, दोन बहिणींनी आपलं अर्ध-अर्ध यकृत केलं दान!

कर्क राशी (Cancer Horoscope)

या राशीच्या लोकांना गज केसरी योग उचीत लाभ मिळवून देणारा ठरणार आहे. कारण राशी स्वामी चंद्र आणि गुरुची उत्तम युती झाली आहे. कर्क राशीच्या लोकांचं नशीब फळफळण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. उत्पन्न वाढेल. सगळ्यांचं सहकार्य मिळेल. जीवनात आनंददायी घटना घडतील. Also Read - Raksha Bandhan Special Movie: बॉलिवूडच्या या चित्रपटात दाखवलंय बहीण-भावांचं अतुट नातं, रक्षाबंधननिमित्त करा एन्जॉय!

धनु: (Sagittarius Horoscope)

चंद्र आणि गुरुच्या युतीमुळे तयार झालेला गज केशरी योगामुळे धनु राशीच्या लोकांना फायदेशीर ठरणार आहे. यशप्राप्ती होईल. कामातील अडथळे दूर होतील. अडकलेला पैसा मिळेल. मोठा निर्णय घेण्यासाठी उत्तम योग आहे.

मीन: (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांच्या जीवनातील अडचणी दूर होतील. परिश्रम घेतल्यास सर्व स्वप्न पूर्ण होतील. तुमच्या कामाचं कौतुक होईल. गज केसरी योग मीन राशीच्या लोकांसाठी शुभ समाचार घेऊन येणार आहे.