मुंबई : आज रक्षाबंधन (Raksha Bandhan 2021) आहे. या दिवसाची प्रत्येक भाऊ-बहीण वाट पाहात असतात. राखी आणि भेटवस्तू, मिठाई आणि अशा बऱ्याच गोष्टींची आधीपासून या दिवसासाठी प्लॅनिंग सुरू असते. योजना सुरु करतात. रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या तारखेला साजरा केला जातो. यावर्षी राखीचा सण 22 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी बहिणी मोठ्या प्रेमाने आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात. यावर्षी राखी पौर्णिमेची तिथी 21 ऑगस्ट रोजी संध्याकाळपासून सुरू होईल आणि 22 ऑगस्ट रोजी सूर्योदयापर्यंत पौर्णिमा असेल. त्यामुळे रक्षाबंधन हा सण 22 ऑगस्ट रोजीच साजरा केला जाईल.Also Read - Raksha Bandhan 2021 Shubh Muhurta: भद्रा मुक्त काळात साजरे करा रक्षाबंधन; जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

रक्षाबंधन 2021 शुभ मुहूर्त (Raksha Bandhan 2021 Shubh Muhurat)

  • शुभ वेळ: 22 ऑगस्ट रविवारी सकाळी 05:50 ते संध्या 06.03 वाजेपर्यंत.
  • रक्षाबंधनासाठी दुपारची वेळ उत्तम : दुपारी 01: 44 ते 04 :23 वाजेपर्यंत.

अशी बांधा राखी (Raksha Bandhan Vidhi)

राखी बांधण्यासाठी ताट सजवा. त्यात रोली, कुंकू, अक्षता, दिवा, मिठाई आणि राखी ठेवा. राखी बांधण्याआधी भावाला टिळा लावा आणि त्याच्या उजव्या हातावर संरक्षक धागा बांधा. त्यानंतर भावाची आरती ओवाळा. भावाला मिठाई द्या. राखी बांधल्यानंतर बांधवांनी त्यांच्या इच्छेनुसार आणि क्षमतेनुसार बहिणींना भेटवस्तू द्याव्यात. Also Read - Raksha Bandhan 2021 Date: कधी आहे रक्षाबंधन? जाणून घ्या तिथी, महत्त्व, राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

Also Read - Raksha Bandhan 2021 Date: कधी आहे रक्षाबंधन? जाणून घ्या तिथी, महत्त्व, राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त