Top Recommended Stories

Ravivar Che Upay : सूर्य देवाला प्रसन्न करण्यासाठी रविवारी करा 'हे' उपाय, भाग्याची मिळेल साथ!  

Ravivar Che Upay : आठवड्यातील सात दिवस ज्यांना सूर्यदेवाला ( Lord Surya ) जल अर्घ्य देणे शक्य होत नाही, त्यांनी रविवारी सूर्यदेवाला जल अर्घ्य ( Jal Arghya )  द्यावे. असे केल्याने त्यांना इतर दिवसचे देखील पुण्य लाभते. असे केल्याने कुंडलीतील (Kundali) सूर्य मजबूत होतो. तसेच प्रगतीचे ( Success ) मार्ग खुलतात.  

Updated: April 24, 2022 9:45 AM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

Ravivar Che Upay : सूर्य देवाला प्रसन्न करण्यासाठी रविवारी करा 'हे' उपाय, भाग्याची मिळेल साथ!  

Ravivar Che Upay: हिंदू धर्मानुसार ( Hindu Dharma ) रविवारचा दिवस हा सूर्य देवासाठी ( Surya Dev ) समर्पित आहे. ज्योतिषमध्ये (Jyotish) सूर्याला (Lord Surya) ग्रहांचा राजा मानण्यात आले आहे. जे व्यक्ती आठवड्यातील सात दिवस सूर्य देवाला अर्घ्य देऊ शकत नाही. त्यांनी फक्त रविवारी देखील सूर्य देवाला जल दिर्घ (Surya Dev Puja ) दिले तरी इतर दिवसांचे पुण्य लाभते. रविवारच्या दिवशी उपवास (Sunday Fast) करणे तसेच सूर्यदेवाला अर्घ्य देणे शुभ मानण्यात आले आहे, असे केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील ( Kundali ) सूर्य मजबूत होत प्रगतीचे मार्ग खुलतात. यासह कुंडलीत सूर्य मजबूत असेल तर त्याला सुख, आरोग्य, यश आणि कीर्ती प्राप्त होते. सूर्य कमजोर असल्याचे याचे विपरीत परिणाम व्यक्तीला सहन करावे लागतात. रविवारच्या दिवशी विधिवत श्रद्धा भावाने उपासना केल्याने व्यक्तीला बुद्धी, बल, विद्या, तेज आणि वैभव प्राप्त होते. सूर्य देवाला मान, प्रतिष्ठा, सरकारी क्षेत्रात यश देण्याचे कारक मानले जाते. त्यानुसार आज या लेखात तुम्हाला सांगणार आहोत रविवारी करायचे काही सोपे आणि साधे उपाय जेणे करून तुमचे भाग्य उजळेल. चालतर मग जाणून घेऊया त्या उपायांविषयी सविस्तर माहिती…

Also Read:

गायीला पोळी खाऊ घाला

हिंदू धर्मात गायीला आईचा दर्जा देण्यात आला आहे. गाय हिंदूंसाठी पूजनीय आहे. गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास आहे. रविवारी सकाळी गायीला पोळी खाऊ घातल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात. हा उपाय दररोज केला तरी हरकत नाही.

You may like to read

कुंकू आणि लाल फुलाने द्या अर्घ्य

सुर्यादेव प्रगतीची देवता आहे. सूर्यदेवाला लाल रंग अतिशय प्रिय आहे. सूर्य देवाला अर्घ्य देतेवेळी तांब्याच्या कलसमध्ये पाणी घ्या. त्यात कुंकू आणि लाल रंगाचे फुल टाकून दररोज किंवा रविवारी सूर्यादेवाला जल अर्पित करावे.

माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला

जीवनात संपन्नता आणि सुख-शांतीसाठी माशांना पिठाचे गोळे बनवून खाऊ घातले पाहिजे. यामुळे सूर्य देव प्रसन्न होतात. हा उपाय दररोज केला पाहिजे. मात्र दररोज शक्य नसल्यास फक्त रविवारी देखील हा उपाय केला जाऊ शकतो.

गरजूंची मदत करा

रविवारी गरजू तसेच असहाय्य व्यक्तीची मदत केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात. असे म्हणतात पूजा-पाठ करा किंवा नका करू, गरजूंना मदत केल्याने पूजा-पाठ केल्या इतकेच पुण्य लाभते. त्यामुळे रविवारी गरजूंना मदत करावी.

(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या