Raviwar che Upay: रविवारी करा हे 10 उपाय, माता लक्ष्मीच्या कृपेने व्हाल धनवान
Raviwar che Upay: रविवारी सूर्याची पूजा केली जाते तशीच देवी लक्ष्मीच्याही पूजेला महत्त्व असते. असे मानले जाते की रविवारी काही विशिष्ट उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते भक्तांवर धन आणि धान्याचा वर्षाव करते. जाणून घेऊया रविवारी कोणते उपाय केल्याने माता लक्ष्मी होईल प्रसन्न...

Raviwar che Upay: हिंदू धर्मात (Hinduism) प्रत्येक दिवस म्हणजे प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतो. रविवारी सूर्याची पूजा (worship of sun) केली जाते. यासोबतच देवी लक्ष्मीचीही पूजा (Goddess Lakshmi worship) केली जाते. असे मानले जाते की रविवारी काही विशिष्ट उपाय (Remedies on Sunday) केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न (Mata Lakshmi) होते आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देते. तुम्हालाही देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर रविवारी काही उपाय करू शकता. आज आपण जाणून घेऊया की रविवारी कोणते उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपा होते आणि धन आणि धान्याचा वर्षाव होतो.
Also Read:
रविवारी करण्याचे उपाय
- रविवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली चतुर्मुखी दिवा लावल्याने धन-समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते. असे केल्याने माता लक्ष्मीची भक्तांवर सदैव कृपा राहते.
- रविवारी पूजा केल्यानंतर घरातील सर्व सदस्यांच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावावा. असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.
- रविवारच्या दिवशी पिठाचे गोळे करून माशांना खाऊ घालणे शुभ मानले जाते. हा उपाय केल्याने घरात कधीही धन आणि अन्नाची कमतरता भासत नाही.
- देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर रविवारी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला गाईच्या तुपाचा दिवा लावावा.
- रविवारी सायंकाळी शिवमंदिरात गौरी शंकराची पूजा करून त्यांना रुद्राक्ष अर्पण करावा.
- रविवारी संध्याकाळी पिंपळाच्या पानावर तुमची इच्छा लिहून वाहत्या पाण्यात टाकल्यास तुमची मनोकामना पूर्ण होते अशी मान्यता आहे.
- कोणतेही काम करताना अपयश येत असेल तर रविवारी झोपण्यापूर्वी एक ग्लास गाईचे दूध आपल्या उशाशी ठेऊन झोपावे. नंतर सकाळी देवीची पूजा करून त्या दुधाचे सेवन करावे.
- रविवारी तीन नवीन झाडू खरेदी करून देवीच्या मंदिरात ठेवा. परंतु हे करत असताना तुम्हाला कोणी पाहणार नाही आणि हटणार नाही याची काळजी घ्या. हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी धनाचा वर्षाव करते असे मानले जाते.
- सूर्यदेव आणि देवी लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी रविवारी ‘आदित्य हृदया श्रुत’ चे पठण करावे. याचे पठण केल्याने घरात सदैव समृद्धी नांदते.
- रविवारी मुग्यांना खाऊ घालणे देखील शुभ मानले जाते. त्यामुळे या दिवशी मुंग्यांना साखर खाऊ घालावी.
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या