Top Recommended Stories

Rose Day 2022: रोझ डेनिमित्त कोणाला गुलाब देताय?, जाणून घ्या त्याच्या वेगवेगळ्या रंगानुसार अर्थ!

Rose Day 2022: रोझ डेच्या निमित्ताने एखाद्या व्यक्तीला गुलाब देताना तुम्ही कोणत्या रंगाचे देऊ असा तुम्ही विचार करत असाल. तर गुलाबाच्या त्या रंगाचा अर्थ तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.

Published: February 7, 2022 10:55 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

rose day 2022
rose day 2022

Rose Day 2022: ज्या व्हेलेंटाईन वीकची (Rose Week 2022) सर्वजण आतुरतेने वाट पाहतात त्याची आजपासून सुरुवात झाली आहे. रोझ डेने या व्हेलेंटाईन वीकला (Valentine Day 2022) सुरुवात होते. रोझ डेनिमित्त सर्वजण वर्षभरापासून आपल्या हृदयात साठवून ठेवलेले प्रेम आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाब (Rose) देऊन व्यक्त करतात. रोझ डेच्या दिवशी गुलाब देण्याला विशेष महत्व असते. गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांचे वेगवेगळे अर्थ आहेत. आज रोझ डेच्या निमित्ताने एखाद्या व्यक्तीला गुलाब देताना तुम्ही कोणत्या रंगाचे देऊ असा तुम्ही विचार करत असाल. तर गुलाबाच्या त्या रंगाचा अर्थ तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. आज आम्ही रोझ डेच्या निमित्ताने तुम्हाला गुलाबाच्या रंगानुसार त्याचा अर्थ काय आहे हे सांगणार आहोत…

Also Read:

लाल गुलाब (Red Rose)-

लाल गुलाब प्रेम, उत्कटता आणि भावनांशी संबंधित असल्याचे मानले जाते. लाल गुलाबाची खासियत म्हणजे ते देऊन तुम्ही समोरच्या व्यक्तीला तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे याची जाणीव करून देऊ शकता.

You may like to read

पिवळा गुलाब (Yellow Rose) –

पिवळा गुलाब हे मैत्रीचे प्रतीक मानले जाते. जर तुम्हाला तुमच्या मित्रांना सांगायचे असेल की तुमचे त्यांच्यावर प्रेम आहे तर तुम्ही त्यांना पिवळे गुलाब देऊ शकता. पिवळा रंग आनंद आणि चांगले आरोग्य देखील प्रतीक आहे.

पांढरा गुलाब (White Rose)-

पांढरा गुलाब तेव्हा दिला जातो जेव्हा तुमची कोणाशी खूप भांडण झाली असेल पण आता तुम्हाला सर्वकाही विसरून नवीन पद्धतीने तुमच्या नात्याची सुरुवात करायची आहे. याशिवाय पांढरा गुलाब शांततेचे प्रतीक मानला जातो.

गुलाबी गुलाब (Pink Rose) –

व्हॅलेंटाईन डे फक्त जोडप्यांसाठी नाही. तुम्ही तुमच्या पालकांसोबतही तो साजरा करू शकता. अशा परिस्थितीत, रोझ डेच्या दिवशी तुम्ही त्यांना गुलाबी गुलाब देऊ शकता. एखाद्याचे आभार मानण्यासाठी गुलाबी गुलाब दिले जातात.

केशरी गुलाब ( Orange Rose) –

गुलाबाचा हा रंग उत्कटतेचे प्रतीक आहे. हे उत्साह, इच्छा दर्शवते. जोडपे त्यांच्या प्रेमात उत्कटता आणि उत्साह आणण्याचे प्रतीक म्हणून नारिंगी गुलाब देऊ शकतात.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 7, 2022 10:55 AM IST