Rudraksh Niyam: रुद्राक्षाची माळ धारण केली असेल तर करू नका या चुका, अन्यथा होईल नुकसान

Rudraksh Niyam : हिंदू धर्मात रुद्राक्ष अत्यंत पवित्र मानला जातो. याला ज्योतिषशास्त्रीय महत्त्व आहे. धार्मिक ग्रंथांनुसार रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकराच्या अश्रूंपासून झाली होती. म्हणूनच हे भगवान शंकराचे रूप मानले जाते.

Published: February 28, 2022 8:43 AM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Rudraksh Niyam : रुद्राक्षाची माळ धारण केली असेल तर करू नका या चुका, अन्यथा होईल नुकसान

Rudraksh Niyam : हिंदू धर्मात रुद्राक्ष (Rudraksh) अत्यंत पवित्र मानला जातो. याला ज्योतिषशास्त्रीय महत्त्व आहे. धार्मिक ग्रंथांनुसार रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकराच्या अश्रूंपासून झाली होती. म्हणूनच हे भगवान शंकराचे (Lord Shiva) रूप मानले जाते. प्राण्यांच्या कल्याणासाठी अनेक वर्षे तपस्या केल्यावर जेव्हा भगवान शंकराने डोळे उघडले तेव्हा त्यांच्या डोळातून अश्रू पडले आणि धरती मातेने रुद्राक्ष वृक्षांना जन्म दिला. अनेकजण रुद्राक्ष धारण करतात. रुद्राक्ष एका मुखीपासून चौदा मुखींपर्यंत असतो. प्रत्येक रुद्राक्षाचे स्वतःचे महत्त्व (Rudraksh Significance) असते. अशा परिस्थितीत रुद्राक्ष धारण करताना काही नियमांचे (Rudraksh Niyam) पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीने या नियमांचे पालन करावे अन्यथा भगवान शंकराचा कोप होऊ शकतो. कोणते आहेत ते नियम जाणून घेऊया… (Rudraksh Niyam: Do you also wear Rudraksha? Then don’t do these mistakes, will be loss instead of the benefit)

Also Read:

रुद्राक्ष धारण करण्याचे नियम

  • दुसर्‍याने घातलेला रुद्राक्ष कधीही धारण करू नका किंवा तुमचा रुद्राक्ष दुसर्‍याला घालू नका. रुद्राक्षाची माळ बनवताना लक्षात ठेवा की त्यात किमान 27 मणी असावेत.
  • रुद्राक्षाला घाणेरड्या हातांनी कधीही स्पर्श करू नका. रुद्राक्षाची माळ नेहमी आंघोळीनंतरच घालावी.
  • रुद्राक्ष नेहमी लाल किंवा पिवळ्या धाग्यात धारण करावा. काळ्या धाग्यात कधीही घालू नये.
  • जर तुम्ही रुद्राक्ष धारण करत असाल तर मांसाहार करू नका. असे केल्याने तुमचेच नुकसान होऊ शकते.
  • रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीने दररोज भगवान शंकराची पूजा करावी. यामुळे भगवान शंकर प्रसन्न होतात.

कशी झाली रुद्राक्षाची उत्पत्ती?

प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी भगवान शिव हजारो वर्षे साधना करत होते. एके दिवशी त्याचे डोळे उघडले तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा एक थेंब जमिनीवर पडला. त्या अश्रूतून रुद्राक्षाची उत्पत्ती झाली. मानव कल्याणासाठी रुद्राक्ष वृक्ष पृथ्वीवर पसरले आहेत. तेव्हापासून भगवान शिवाची पूजा करण्यासाठी किंवा भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करण्यासाठी रुद्राक्षाचा वापर केला जातो.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 28, 2022 8:43 AM IST