नाकाची (Nose) ठेवण व्‍यक्तीचा स्‍वभाव (Nature), पर्सनालिटी (Personality) आणि त्याच्याबाबत (Qualities) भरपूर काही सांगत असते. समुद्र शास्‍त्रात सरळ आणि लांब नाकाला सर्वश्रेष्‍ठ सांगितलं आहे. असे लोक आयुष्यात मोठी उंची गाठत असतात. त्यांना हवं ते मिळत असतं.

ज्‍योतिषशास्‍त्रात (Jyotish Shastra) ज्याप्रमाणे व्‍यक्तीचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्‍याबाबत सांगितलं जातं, अगदी त्याचप्रमाणे समुद्र शास्त्रात (Samudra Shastra) शरीर (Body) विविध अवयवांची ठेवण, शरीरावरील तीळ, विशिष्ट खूणबाबत भरपूर काही सांगत असतं. आज आम्ही आपल्याला समुद्र शास्‍त्रानुसार, नाकाच्या ठेवणीवरुन (Nose) संबंधित व्‍यक्तीचा स्वभाव आणि भविष्यबाबत सांगणार आहोत.

नाक असं उलगडते व्यक्तिमत्वाबाबत अनेक रहस्य…

– ज्या लोकांचं नाक सरळ असतं, ते लोक मनातील गोष्ट सहज कोणाला सांगत नाहीत. असे लोक आत्मविश्वासाच्या बळावर स्वत: अडचणीवर मात करतात. परंतु असे लोक प्रेमप्रकरणात यशस्वी होत नाहीत.

– ज्या लोकांच नाक मध्यभागी उंच असतं, अशा लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते. मात्र, या लोकांमध्ये लीडरशिप क्‍वालिटी आणि मॅनेजमेंटमध्ये ते उत्तम असतात. या लोकांना राग देखील कमी येतो.

– ज्या लोकांचं नाक पोपटासारखं समोरच्या बाजुला झुकलेलं असतं, अशा लोकांना लवकर राग येतो. परंतु असे लोक खूप मेहनती असतात. अशी लोक यशस्वी होण्यासाठी काहीपण करायला तयार असतात.

– चपटं नाक असलेल्या लोकांची पर्सनालिटी खूप चांगली असते. परंतु थोड्या थोड्या वेळात त्यांचा मूड बदलत असतो. असे लोक विचारपूर्वक निर्णय घेतात. काही नवीन करण्यात त्यांना जास्त रस असतो.

– छोटी नाक वाले लोग अपनी जिंदगी में ही मस्‍त रहते हैं और सोशल होना कम ही पसंद करते हैं.

– सरळ आणि लांब नाक असलेले लोक खूप आकर्षक आणि भाग्‍यशाली असतात. जीवनात प्रत्येक आनंद ते सहज मिळवतात. त्यांना फिरणे, मौजमस्ती करणं खूप आवडतं.

(टीप: वरीव लेखात दिलेली माहिती परंपरेवर आधारित आहे. India.com या माहितीचं समर्थन करत नाही.)