Top Recommended Stories

Sankashti Chaturthi 2022: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जरुर वाचा ही व्रतकथा, मुलांना दीर्घायुष्याचे मिळेल वरदान

Sankashti Chaturthi 2022 : शास्त्रानुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत कथा ऐकल्यानंतरच व्रत पूर्ण होतो असे मानले जाते आणि याचा त्यानंतरच लाभ मिळतो.

Published: January 21, 2022 6:00 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Baby Boy Names of Lord Ganesha in hindi Baby Boys name on Hindu Lord Ganesha
बेबी ब्वॉय के हिंदी में यूनिक नाम

Sankashti Chaturthi 2022 : प्रत्येक गणेशभक्त (Ganesh bhakta) संकष्टी चतुर्थीची (Sakat Chauth 2022) आतुरतेने वाट पाहत असतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लाडक्या बाप्पाची मनोभावाने पूजा केली जाते. आज, 21 जानेवारीला संकष्टी चतुर्थी (Ganesh Chaturthi 2022)आहे. या दिवशी विधीनुसार भगवान गौरी गणेशाची (Gauri Ganesha) पूजा करुन व्रत केला जातो. असे केल्यामुळे मुलांचे आयुष्य दीर्घायुषी होते आणि मनोकामना पूर्ण होतात. संकष्टी चतुर्थीच्या व्रताला संकष्टी चतुर्थी (Sankasti Chaturthi 2022), वक्रकुंडी चतुर्थी (Vakratund Chaturthi), तिळकुट चतुर्थी (Tilkut Chaturthi) असेही म्हणतात. शास्त्रानुसार या दिवशी व्रत कथा ऐकल्यानंतरच व्रत पूर्ण होतो असे मानले जाते आणि याचा त्यानंतरच लाभ मिळतो. (Lambodara Sankashti)

Also Read:

सकष्टी चतुर्थी व्रत कथा (Sankashti Chaturthi Vrat Katha) –

एक सावकार होता आणि एक सावकारनी होती. दोघांचाही धर्म, दान आणि सदाचार यावर विश्वास नव्हता. त्यांना मूलबाळही नव्हते. एके दिवशी सावकारीन तिच्या शेजाऱ्याच्या घरी गेली. त्या दिवशी संकष्टी चतुर्थीचा दिवस होता आणि शेजारच्या घरामध्ये संकष्टी चतुर्थीची पूजा करत होते. सावकारनीने शेजारी राहणाऱ्यांना विचारले तुम्ही हे काय करत आहात. तेव्हा शेजारी म्हणाले की आज संकष्टी चतुर्थीचा व्रत आहे, म्हणून आम्ही पूजा करत आहोत. सावकारनीने शेजाऱ्याला विचारले, हे व्रत केल्याने काय फळ मिळते. शेजाऱ्याने सांगितले की, असे केल्याने पैसा, धन-धान्य आणि मुलं सर्वकाही मिळते. यानंतर सावकारीन म्हणाली, जर मला मूल झाले तर मी एक चतुर्थांश तिळकुट करीन आणि चतुर्थीचा व्रत ठेवीन. यानंतर गणेशाने सावकारनीची प्रार्थना स्वीकारली आणि ती गर्भवती राहिली.

You may like to read

गरोदर राहिल्यानंतर सावकारनी म्हणाली की, मला मुलगा झाला तर मी अडीच शेर तिळकूट करेन. काही दिवसांनी तिला मुलगा झाला. यानंतर सावकारानी म्हणाली की, माझ्या मुलाचे लग्न झाले तर मी सव्वापाच शेर तिळकूट करीन. गणपतीनेही तिची ही विनवणी सुद्धा ऐकली आणि मुलाचे लग्न ठरले. सगळं होऊनही सावकारनीचे तिळकूट केला नव्हता. त्यामुळे सकट देवता संतप्त झाले. त्यांनी सावकारनीचा मुलगा लग्नात फेऱ्या मारत असताना मधूनच त्याला उचलून पिंपळाच्या झाडावर बसवले. यानंतर सर्वांनी वराचा शोध सुरू केला. वर न सापडल्याने लोक निराश होऊन घरी परतले. सावकारनीचा मुलगा ज्या मुलीशी लग्न करणार होता, ती एके दिवशी तिच्या मैत्रिणींसह गौरी गणेशाची पूजा करण्यासाठी जंगलात गेली. तेवढ्यात तिला पिंपळाच्या झाडातून आवाज आला, ‘माझ्या सावत्र बायको’, सर्व मुली घाबरल्या आणि आपल्या घरी जाऊल त्यांनी आईला घडलेला प्रकार सांगितला.

त्यानंतर मुलीच्या आईने पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन ते पाहिले, तेव्हा कळले की झाडावर बसलेली व्यक्ती तिचा जावई आहे. मुलीची आई जावयाला म्हणाली की तू इथे का बसला आहेस, माझ्या मुलीचे अर्धविवाह झाले आहे, आता तुला काय हवे आहे? यावर सावकारनीच्या मुलाने सांगितले की, माझ्या आईने चतुर्थीचे तिळकूट बोलले होते पण तिने अजून केले नाही. सकट देवता क्रोधित झाले असून त्यांनी मला इथे बसवले आहे. हे ऐकून मुलीची आई सावकारनीच्या घरी गेली आणि तिला विचारले की तू संकष्टी चतुर्थीला काही बोलली होती का?

यावर सावकारनी म्हणते हो, मी तिळकुट म्हणाले होते. त्यानंतर सावकारनी पुन्हा म्हणते की संकष्टी चतुर्थी महाराज माझा मुलगा घरी आला तर मी अडीच मनाचे तिळकूट करीन. त्यावर गणपतीने त्यांना पुन्हा संधी दिली आणि मुलाला परत पाठवले. यानंतर सावकारनीच्या मुलाचे लग्न थाटामाटात झाले. सावकारनीचा मुलगा आणि सून घरी आले. तेव्हा सावकारनीने अडीच मन तिळगूळ देऊन सांगितले की देवा, तुझ्या कृपेने माझ्या मुलावरील संकट दूर झाले आणि माझा मुलगा आणि सून सुखरूप घरी आले. मला तुझा महिमा कळला आहे. आता मी तुझ्या संकष्टी चतुर्थीला नेहमी तिळकूट वाटेल आणि उपवास करीन. यानंतर सर्व नगरवासीयांनी तिळकूटसोबत व्रताला सुरुवात केली.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.