Sankashti Chaturthi 2022: संकष्टी चतुर्थी व्रताची ही आहेत 7 खास वैशिष्ट्ये, घ्या जाणून!

Sankashti Chaturthi 2022: प्रत्येक चतुर्थीची महिमा आणि महत्व खूप वेगवेगळे असते. या चतुर्थीची गणेशभक्त आतुरतेने वाट पाहत असतात.

Published: January 21, 2022 7:00 AM IST

By Priya More | Edited by Priya More

Ganesh Chaturthi 2022
Ganesh Chaturthi 2022

Sankashti Chaturthi 2022: प्रत्येक महिन्यामध्ये दोन संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) असतात. अशाप्रकारे वर्षाला 24 चतुर्थी आणि प्रत्येक तीन वर्षानंतर अधिमास असे मिळून एकूण 26 चतुर्थी असतात. प्रत्येक चतुर्थीची (Sakat Chauth 2022) महिमा आणि महत्व खूप वेगवेगळे असते. या चतुर्थीची गणेशभक्त आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवशी गणेशाची (Ganesh Chaturthi 2022) भक्तीभावाने पूजा केली जाते. आज आपण संकष्टी चतुर्थीची खास सात वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेणार आहोत. (Lambodara Sankashti)

Also Read:

1. चतुर्थी तिथीची दिशा नैऋत्य असते. अमावस्येनंतर येणाऱ्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात आणि पौर्णिमेच्या नंतर कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात.

2. चतुर्थीचे देवता आहेत शिवपुत्र गणेश. या तिथीमध्ये गणपती बाप्पाच्या पूजेने सर्व विघ्नांचा नाश होतो. संकष्टी चतुर्थीचा अर्थ होतो संकटांना हरवणारी चतुर्थी.

3. माघ मासच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी, माघी चतुर्थी असे म्हणतात. बाराही महिन्यांच्या अनुक्रमात ही सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते. यानंतर पौष महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला सुद्धा संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. याला देखील त्याप्रमाणे महत्व असते.

4. चतुर्थीच्या व्रताचे पालन केल्यामुळे संकटापासून मुक्ती होते आणि आर्थिक लाभ प्राप्त होतो. संकष्टीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्यामुळे नकारात्मक प्रभाव दूर होतो आणि घरामध्ये शांती राहते. असे म्हटले जाते की, गणपती बाप्पा घरामध्ये येणाऱ्या सर्व अडचणींना दूर करतो आणि व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण करतो.

5. चतुर्थी ही खुली तारीख आहे. अत: यामध्ये शुभ कार्य वर्जित असतात.

6. जर चतुर्थी गुरुवारी असेल तर मृत्यूदा असते आणि शनिवारची चतुर्थी सिद्धिदा असते. चतुर्थीचे रिक्त होण्याचे दोष त्या विषेश स्थितीत जवळपास समाप्त होऊन जाते.

7. संपूर्ण वर्षात संकष्टी चतुर्थीचे 13 व्रत ठेवले जातात. सर्व व्रतासाठी वेगवेगळी कथा असते.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 21, 2022 7:00 AM IST