Top Recommended Stories

Sankashti Chaturthi 2022: नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी जाणून घ्या मुहूर्त, कथा आणि चंद्रोदयाची वेळ

संकष्टी चतुर्थी 21 जानेवारीला सकाळी 08 वाजून 51 मिनिटाला सुरू होत आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 जानेवारीला सकाळी 09 वाजून 41 मिनिटांला समाप्त होईल. 21 जानेवारीला रात्री चंद्र दर्शनानतर व्रत संपन्न होईल.

Published: January 21, 2022 3:00 AM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Sankashti Chaturthi 2022: नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी जाणून घ्या मुहूर्त, कथा आणि चंद्रोदयाची वेळ

Sankashti Chaturthi January 2022: आज (21 जानेवारी 2022) संकष्टी चतुर्थी. नवीन वर्षातील (New Year 2022) पहिली संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi 2022) या दिवशी आई आपल्या मुलांचे दीर्घायुष्य आपल्या अखंड सौभाग्यासाठी गणपतीकडे (Load Ganesh) प्रार्थना करते. व्रत करते. संकष्ट चतुर्थी अनेक ठिकाणी विविध नावांनी प्रचलित आहे. काही ठिकााणी संकष्टी चतुर्थीला ‘गणेश चतुर्थी’ (Ganesh Chaturthi 2022) असेही म्हणतात. माघी चतुर्थी (Maghi Chaturthi), लंबोदर संकष्‍टी (Lambodhar Chaturthi)आणि तिलकुटा (Tilkuta) अशा विविध नावांनी संकष्टी चतुर्थी प्रचलित आहे. (Sakat Chauth 2022)

हिंदू पंचांगानुसार प्रत्येक मराठी महिन्याच्या कृष्ण पक्षात (Magh Month Chaturthi 2022) येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी असे संबोधले जाते. संकष्टी चतुर्थीला गणेश पूजा करून व्रत केल्याने मुले आणि पतीच्या जीवनात येणारे संकटे दूर होतात. प्रगतीत येणारी सर्व विघ्‍ने विघ्नहर्ता दूर करतात. या दिवशी आई आपल्या मुलांच्या दीर्घआयुष्यासाठी गणपतीकडे प्रार्थना करतात. रात्री चंद्रदर्शन करून त्याला अर्ध्‍य देतात. त्यानंतर उपवास सोडतात.

You may like to read

संकष्टी चतुर्थी व्रत 2022: तिथी, कथा आणि मुहूर्त

संकष्टी चतुर्थी 21 जानेवारीला सकाळी 08 वाजून 51 मिनिटाला सुरू होत आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 जानेवारीला सकाळी 09 वाजून 41 मिनिटांला समाप्त होईल. 21 जानेवारीला रात्री चंद्र दर्शनानतर व्रत संपन्न होईल.

संकष्ट चतुर्थीची कथा (Sankashti Chaturthi 2022)

श्री गणेश कोशनुसार, प्रत्येक व्यक्तीला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत 4 प्रकारच्या संकटातून जावे लागते. त्यात प्रसूतिजन्य, बाल्यावस्था, मरणात्मक आणि यमलोकगमनाचा समावेश आहे. व्यक्तीची संकटातून मुक्तता होण्यासाठी श्री गणपतीने संकष्ट चतुर्थीचे व्रत सांगितले आहे. जीवनातून विघ्ने दूर करण्यासाठी संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते. गणपतीला विघ्नहर्ता असे म्हटले जाते. त्यामुळेच गणपती प्रथम पूज्य आहेत. घरात कोणत्याही मंगल कार्याची सुरूवात गणेश पूजेनेच होते.

चंद्रोदयाची वेळ: 21 जानेवारी, रात्री जवळपास 9 वाजता.. (Sakat Chauth 2022)

संकष्टी चतुर्थीला गणेशाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे जाणून घ्या प्रमुख शहरातील चंद्रोदयाची वेळ…

मुंबई- रात्री 9 वाजून 25 मिनिटे.
पुणे- रात्री 9 वाजून 21 मिनिटे.
नाशिक- रात्री 9 वाजून 20 मिनिटे.
धुळे- रात्री 9 वाजून 25 मिनिटे.
औरंगाबाद- रात्री 9 वाजून 14 मिनिटे.
अहमदनगर- रात्री 9 वाजून 17 मिनिटे.
कोल्हापूर- रात्री 9 वाजून 21 मिनिटे.
रत्नागिरी- रात्री 9 वाजून 25 मिनिटे.
अकोला- रात्री 9 वाजून 6 मिनिटे.
सोलापूर- रात्री 9 वाजून 13 मिनिटे.
अमरावती- रात्री 9 वाजून 3 मिनिटे.
नागपूर- रात्री 8 वाजून 57 मिनिटे.
चंद्रपूर- रात्री 8 वाजून 55 मिनिटे.
सातारा- रात्री 9 वाजून 21 मिनिटे.
सांगली- रात्री 9 वाजून 20 मिनिटे.
बीड- रात्री 9 वाजून 13 मिनिटे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.