By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Sankashti Chaturthi 2022 : ज्येष्ठ महिन्यात 'या' दिवशी साजरी केली जाईल संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजाविधी
Sankashti Chaturthi 2022 : पुराणानुसार चतुर्थीला (Sankashti Chaturthi) गणपतीची पूजा (Ganesh Pujan) तसेच उपवास केल्याने सर्व प्रकारचे कष्ट दूर होते. गणेश या दिवशी उपवास (Sankasht Chaturthi Vrat) केल्याने सौभाग्य, समृद्धी व संतान सुखाची प्राप्ती होते. यादिवशी गणपतीचे स्मरण करत धार्मिक कार्याला वेळ दिला पाहिजे.

Sankashti Chaturthi 2022 : हिंदू धर्मात (Hindu Dharmat) भगवान गणपतीला (Lord Ganesha) विशेष महत्त्व आहे. कोणतेही शुभ कार्य असो, या कार्याची सुरुवात गणेश पूजनाने (Ganesha Puja Vidhi) होते. मान्यतेनुसार गणेश पूजनाशिवाय कोणतेच शुभ कार्य सिद्ध होत नाही. अशा या विघ्नहर्ता (Vighnaharta) गणपतीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर यासाठी संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) सर्वोत्तम मानली जाते. तुम्हालाही श्रीगणेशाला प्रसन्न करत आशीर्वाद घ्यायचा असेल तर या दिवशी अवश्य व्रत करा. त्यानुसार ज्येष्ठ महिन्यातील (Jyesht Mohina) कृष्ण पक्षातील (Krusha Paksha) चतुर्थी 17 जून रोजी आहे. या दिवशी गणेश पूजनासह व्रत पाळला जातो. या दिवशी विधिवत व्रत आणि पूजन केल्यास भगवान गणेशजींचा आशीर्वाद प्राप्त होत मनोकामना पूर्ण होते.
संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त
ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीच्या दिवशी संकष्टी चतुर्थी आहे. 17 जून रोजी सकाळी 6:10 वाजता चतुर्थी सुरू होईल आणि 18 जून रोजी पहाटे 2:59 वाजता समाप्त होईल. विशेष म्हणजे या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. हा योग 17 जून रोजी सकाळी 11:30 ते दुपारी 12:25 पर्यंत असेल. चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यावरच संकष्टी चतुर्थीची पूजा पूर्ण होते, त्यानुसार या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री 10:03 वाजता आहे.
अशी करा संकष्टी चतुर्थीची पूजा
गणपतीला चतुर्थी तिथी प्रिय असून या दिवशी गणपतीची पूजा केल्याने शुभ फळ लाभते. चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने भक्तांची सर्व संकटापासून मुक्ती होत सुख-समृद्धी लाभते. विघ्नहर्ता गणपती भक्तांचे सर्व दुःख दूर करत भक्तांना सुख, शांती आणि समृद्धी प्रदान करतात. त्यामुळे हिंदू धर्मात चतुर्थीला गणेश पूजन करण्याचे विशेष महत्व आहे. त्यानुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी स्नान करून हातात थोडेसे पाणी घेऊन संकष्टी चतुर्थीचे व्रत व पूजा संकल्प करावा. यानंतर गणेशाची पूजा करावी. पूजेच्या साहित्यात चंदन, मोदक, फळे, फुले, वस्त्र, धूप, दीप, गंध, दुर्वा यांचा समावेश करा. पूजेनंतर या व्रताची कथा ऐका आणि श्रीगणेशाची आरती करा.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या