Sankashti Chaturthi 2022: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्यामुळे संकट होतात दूर; पूजा आणि महत्व घ्या जाणून!
Sankashti Chaturthi 2022: 2022 या वर्षातील ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे. हे व्रत माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला पाळले जाते.

Sankashti Chaturthi 2022: चतुर्थी तिथी (Chaturthi Tithi) ही सर्व तिथींची जननी आहे. चतुर्थीचा अधिपती गणेश (Ganesha) आहे. त्यामुळे चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची (Ganpati Bappa) पूजा केली जाते. आज म्हणजेच 21 जानेवारी 2022 रोजी संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi 2022) साजरी केली जात आहे. 2022 या वर्षातील ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे. हे व्रत माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला पाळले जाते. सकट चौथला संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) आणि तिलकुट चतुर्थी किंवा तिल चतुर्थी असेही म्हणतात. हा हिंदू धर्मातील प्रसिद्ध सण आहे. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाची पूजा (Ganesh Puja) केली जाते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. गणपती बाप्पा हे प्रथम पूज्य देवता असल्याचे म्हटले जाते. त्याला बुद्धी, विवेक, शक्ती या देवतेचा दर्जा प्राप्त झाला आहे. गणपतीला प्रसन्न करण्यासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते. आज आपण संकष्टी चतुर्थीची पूजा पद्धत आणि महत्त्व याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत….
Also Read:
संकष्टी चतुर्थी व्रत तिथी –
संकष्टी चतुर्थीची सुरुवात – 21 जानेवारी, शुक्रवार – सकाळी 08:51 पासून.
संकष्टी चतुर्थीचा शेवट – 22 जानेवारी, शनिवार, सकाळी 09.14 पर्यंत.
संकष्टी चतुर्थीचे महत्व –
संकष्टी चतुर्थीचा उपवास स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि जीवनात यश मिळवण्यासाठी करतात. या व्रताच्या प्रभावाने मुलांना रिद्धी-सिद्धी मिळते. तसंच गणपती बाप्पा त्यांच्या जीवनात येणारे सर्व अडथळे दूर करतात आणि त्यांच्यावर नेहमी कृपादृष्टी ठेवतात.
संकष्टी चतुर्थी व्रत पूजा पद्धत –
– संकष्टी चतुर्थी व्रताच्या दिवशी स्त्रियांनी पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत.
– श्रीगणेशाची आराधना करा आणि व्रताचा संकल्प करा.
– सूर्यास्ताच्या वेळी पाटावर लाल कपडा टाकून श्रीगणेशाची आणि माता चौथाची मूर्ती स्थापित करून त्यांची पूजा करावी.
– याशिवाय श्रीगणेशाची आणि मातेची सकट यांची पूजा पाणी, रोळी, मोळी, तांदूळ, गूळ, तूप, धूप, दिवा, फूल, फळ, धूर, तीळ किंवा तिळपापडी, तिळाचे लाडू इत्यादींनी करा.
– गणपतीची आणि माता चौथची कथा जरूर ऐकावी.
– रात्री चंद्र उगवल्यानंतर चंद्राची पूजा करून त्याला जल अर्पण करून सकट चौथचे व्रत पूर्ण करावे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या