Shakambhari Navratri 2022: आजपासून शाकंभरी नवरात्रोत्सवाला सुरुवात, जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

शाकंभरी नवरात्रोत्सव पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून सुरू होतो आणि पौष पौर्णिमेपर्यंत चालतो. यंदा शाकंभरी देवीची पूजा पौष शुक्ल अष्टमीला 10 जानेवारीला सुरू होत असून ती 17 जानेवारीला पौष पौर्णिमेला संपेल.

Published: January 10, 2022 5:00 AM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

Shakambhari Navratri 2022: आजपासून शाकंभरी नवरात्रोत्सवाला सुरुवात, जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व
Shakambhari Navratri 2022 Shakambhari Navratri Start from today, Know Pooja Rituals and Significance

Shakambhari Navratri 2022 : शाकंभरी नवरात्रोत्सव पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून सुरू होतो आणि पौष पौर्णिमेपर्यंत चालतो. यंदा शाकंभरी देवीची पूजा पौष शुक्ल अष्टमीला 10 जानेवारीला सुरू होत असून ती 17 जानेवारीला पौष पौर्णिमेला (Shakambhari Navratri 2022 Date) संपेल. याला शाकंभरी नवरात्रोत्सव असेही म्हणतात. पौष महिन्यातील पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी माता शाकंभरीची जयंती साजरी केली जाते. सहारनपूरच्या शिवालिक परिसरात शाकंभरी देवीची मोठी जत्रा भरते.

Also Read:

कोण आहे देवी शाकंभरी? (Shakambhari Navratri 2022)

शाकंभरी देवी ही भाजीची देवी असल्याचे म्हटले जाते. देवी शाकंभरी हे माता पार्वतीचे रूप आहे. तिला अनेक नावे आहेत. माता शाकंभरीला देवी वनशंकरी आणि शताक्षी असेही म्हणतात. देवी भागवत महापुराणात शाकंभरी मातेचे वर्णन देवी दुर्गेचे रूप असे केले आहे. पुराणानुसार देवी पार्वतीने प्रभू शंकराला मिळविण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. देवीने अन्न आणि पाणी सोडून दिले होते आणि जगण्यासाठी फक्त पाले भाज्यांचे सेवन केले. म्हणूनच तिला शाकंभरी असे नाव पडले.

दुसऱ्या आख्यायिकेनुसार जेव्हा पृथ्वीवर शंभर वर्षे पाऊस पडला नाही तेव्हा मानवांचे दुःख पाहून ऋषींनी मातेची प्रार्थना केली. मग शाकंभरीच्या रूपाने मातेने आपल्या शरीरातून जन्माला आलेल्या वनौषधींमधूनच विश्वाचे पालन पोषण केले. अशा प्रकारे देवीने विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले. त्यामुळे शाकंभरी जयंतीच्या दिवशी फळे, फुले आणि हिरव्या भाज्या दान करण्याचे खूप महत्त्व आहे.

पूजा विधी (Shakambhari Navratri 2022 Puja Vidhi)

पौष महिन्याच्या अष्टमी तिथीला सकाळी उठून स्नान करावे. प्रथम गणेशाची आराधना करावी आणि नंतर माता शाकंभरीचे ध्यान करावे. लाकडी पाटावर लाल कपडा घालून आईची मूर्ती किंवा फोटो ठेवा. ताजी फळे आणि हंगामी भाज्या पूजेबोवती चौबाजूने ठेवा. गंगाजल शिंपडून देवीची पूजा करा. तिच्या प्रसादात खीर-पुरी, फळे, वनस्पती, भाज्या, खडीसाखर, मिठाई, मेवा यांचा नैवद्य अर्पण करा. देवीला पवित्र अन्न अर्पण करा आणि तिची आरती करा.

पूजेचे फळ

जो भक्त मातेची पूजा, ध्यान, जप, आराधना करतो त्याला लवकरच अन्न, पान आणि अमृत स्वरूपात अक्षय फळ प्राप्त होते. देवीची भक्तिभावाने पूजा करणाऱ्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 10, 2022 5:00 AM IST