By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Shani Amavasya 2022 : शनि अमावस्येच्या दिवशी करा मिठाचे ‘हे’ उपाय, आर्थिक संकटांपासून मिळेल मुक्ती
Shani Amavasya 2022 : हिंदू धर्मात शनी अमावस्येचे विशेष महत्त्व (Shani Amavasya ) सांगण्यात आले आहे. या दिवशी शनिदेवाची विधीपूर्वक पूजा केली जाते. शनि अमावस्येच्या दिवशी जप, तप, दान इत्यादींना विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

Shani Amavasya 2022 : प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या (Krushna Paksha ) शेवटच्या तारखेला अमावस्या (Amavasya) येते. ज्या महिन्यात अमावस्या येते त्या महिन्याच्या नावाने ती ओळखली जाते. त्यानुसार चैत्र महिन्यात येणारी अमावस्या चैत्र अमावस्या (Chaitra Amavasya ) म्हणून ओळखली जाते. यावेळी चैत्र अमावस्या शनिवार 30 एप्रिल रोजी येत आहे. शनिवारी येणारी अमावस्या शनिश्चरी अमावस्या म्हणून ओळखली जाते. हिंदू धर्मात शनी अमावस्येचे विशेष महत्त्व (Shani Amavasya ) सांगण्यात आले आहे. या दिवशी शनिदेवाची विधीपूर्वक पूजा केली जाते. शनि अमावस्येच्या दिवशी जप, तप, दान इत्यादींना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. यासह शनि अमावस्येच्या दिवशी मिठाचे काही उपाय केल्यास माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. चला तर मग जाणून घेऊया शनि अमावस्येच्या दिवशी करण्यात येणार्या उपायाविषयी…
शनि अमावास्येच्या दिवशी करा हे उपाय –
ज्योतिषशास्त्रानुसार मीठ हे चंद्र, शुक्र आणि राहूचे प्रतीक मानले जाते. या ग्रहांचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी शनि अमावस्येच्या दिवशी मीठाचे काही उपाय सांगण्यात आले आहेत.
आर्थिक चणचण दूर करण्यासाठी करा हा उपाय –
आर्थिक समस्येमुळे तुम्ही संकटात असाल तर पाण्यात थोडे मीठ टाकून घर पुसावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो. यासह घरात लक्ष्मी नांदते. चुकूनही हा उपाय गुरुवारी करू नये.
Trending Now
काचेच्या ग्लासात थोड पाणी आणि मीठ मिसळा –
शनी अमावास्येच्या दिवशी एका काचेच्या ग्लासात थोडं पाणी आणि मीठ मिसळा. त्यानंतर हे मिश्रण नैऋत्य ( दक्षिण -पश्चिम) दिशेत ठेवावे. या मिश्रणजवळ लाल रांगचा बल्ब लावा. पाणी संपल्यानंतर यात पुन्हा पाणी भरावे. हा उपाय केल्याने घरात धनाची कमी भासणार नाही.
शनिश्चरी अमावास्येचे इतर उपाय –
– शनिवारी पिठाचे गोळे बनवून माशांना खाऊ घाला. असे केल्याने घरात कायम लक्ष्मी नांदते.
– शनि अमावस्येच्या दिवशी पितरांना जल अर्पण केल्यानंतर क्षमतेनुसार दान अवश्य करावे
– अमावस्येच्या दिवशी पिंपाळच्या झाडाची पुजा केली जाते. या दिवशी पिंपळला जल अर्पण केल्यानंतर ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करत सात परिक्रमा कराव्या.
– शनि अमावस्येच्या दिवशी पिंपाळाच्या झाडाला जानव, खडाऊ, लांघोट आदी अर्पण करावे. यासह शनीदेवाला मोहरीचे तेल काळे तीळ अर्पण करावे. असे केल्याने शनिची साडेसाती दूर होते.
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या