Top Recommended Stories

Shani Dosh Upay : तुमच्या कुंडलीत शनीदोष आहे का? मग 'या' मंत्राचा जप करा!

Shani Dosh Upay : कुंडलीत शनिदोष असल्यास व्यक्तीला जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो. कुंडलीत शनीदोष असल्यास व्यक्तीला जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो. तुमच्या कुंडलीत देखील शनीदोष असेल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरेल.

Updated: March 26, 2022 11:03 AM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

Shani Dosh Upay : तुमच्या कुंडलीत शनीदोष आहे का? मग 'या' मंत्राचा जप करा!
Shani Dosh Upay : ज्योतिष शास्त्रामध्ये (astrology) शनीला (Shani) प्रभावशाली ग्रह मानले जाते. न्यायप्रिय असलेले शनीदेव (shani dev) व्यक्तीच्या चांगल्या कर्माचे चांगले फळ देतात. तर दुसरीकडे वाईट कर्म करणाऱ्याना दंड देखील देतात. कुंडलीत शनीदोष (shani Dosh) असल्यास व्यक्तीला जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो. तुमच्या कुंडलीत देखील शनीदोष असेल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. ज्योतिषमध्ये शनीदोष (shani dosh upay) दूर करण्यासाठी काही उपाय सांगितले आहे. हे उपाय केल्यास शनीदोष दूर होत व्यक्तीवर शनीकृपा होते. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत उपाय…
शनीदोष दूर करण्यासाठी लोकं शनिवारी शनीदेवाच्या पूजेसह इतर उपाय करतात. पौराणिक मान्यतेनुसार सूर्यपुत्र शनिदेवाचे दुसरे घर मकर राशीला मानले गेले आहे. शनिवारी काळ्या तिळाने शनीदेवाची पूजा केल्यास दुःखचा नाश होतो. यासह जर कोणाच्या कुंडलीत शनीदोष असल्यास त्याचाही नाश शनीदेवाच्या पूजेने होतो.

मंत्र जप केल्याने सुद्धा मिळतो लाभ –

शनीदोष दूर करण्यासाठी पूजा विधीसह मंत्रोपचार हा देखील प्रभावी उपाय आहे. शनीदेवाशी संबंधित असे काही मंत्र आहेत ज्याचा जप केल्याने शनिदोष दूर होते. शनिदोष दूर होत व्यक्तीच्या जीवनात प्रगतीचे मार्ग मोकळे होतात.

शनी महामंत्र –

ॐ नीलांजन समभसं रविपुत्रं यमग्रजम्।
छायामार्तंड सम्भूतं तं नमामि शनिश्चरम् ।
शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी या मंत्राचा 108 वेळा जप केला पाहिजे.

आरोग्यासाठी मंत्र

ध्वजिनी धामिनी चैवा कंकली कलहप्रिहा।
कंकटी कलही चौथ तुरंगी महिषी अजा ।
शणैर्णमणी पत्नीनामेतानि संजपन पुमान् ।
दुःखानि नास्यन्नित्यं सौभाग्यमेधते सुखम् ।
सुदृढ आरोग्यासाठी शनिदेवाच्या या मंत्राचा १०८ वेळा जप करा.

वैदिक मंत्र

ॐ शन्नोदेवीर भिष्टयआपो भवन्तु पीतेये
श्यायोर्भिस्त्रवंतुनः।
जर एखाद्या व्यक्तीला शनीची महादशा येत असेल तर या मंत्राचा जप केल्याने या महादशापासून मुक्ती मिळते.

पौराणिक मंत्र

ॐ ह्रीं नीलांजनसमभसम रविपुत्रम् यमग्रजम्।
छाया मार्तंडसंभूतं त नमामि शनैश्चरम् ।
या मंत्राचा जप करताना शनिदेवाला निळे फूल अर्पण करावे.

गायत्री मंत्र

ॐ भगभावाय विद्महे मृत्युरूपाय धीमः तन्नो शनि: प्रचोद्यत्।
ॐ शन्नोदेविर्भिष्टया आपो भवन्तु पितये ।
या मंत्राचा जप करत असताना शनिदेवावर काळे तीळ आणि मोहरीचे तेल चढवावे.
वर दिलेले उपाय व मंत्रांचा जप केल्यास शनिदोषापासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे.
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)

Also Read:

You may like to read

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या