Shani Gochar 2022: सावधान! 'शनी' गोचर ठरू शकतो त्रासदायक, या 3 राशीच्या लोकांवर येणार संकट
Shani Gochar 2022: भारतीय संस्कृतीत (Hindu Sanskruti) ज्योतिषशास्त्राला (Astrology) महत्त्व आहे. 9 ग्रह आणि 27 नक्षत्राच्या स्थितीवरून ज्योतिषशास्त्रात 12 राशींच्या जातकांची भविष्यवाणी केली जाते.

Shani Gochar 2022: भारतीय संस्कृतीत (Hindu Sanskruti) ज्योतिषशास्त्राला (Astrology) महत्त्व आहे. 9 ग्रह आणि 27 नक्षत्राच्या स्थितीवरून ज्योतिषशास्त्रात 12 राशींच्या जातकांची भविष्यवाणी केली जाते. यात काही ग्रह अतिशय विशेष आहे. कारण या ग्रहांच्या छोट्या बदलांचाही मोठा परिणाम बघावयास मिळतो. यात शनी (Shani) हा ग्रह प्रमुख असून शनी कर्मानुसार Shani Vakri 2022 फळ प्रदान करीत असतो.व्यक्तीचे कर्म चांगले नसतील तर व्यक्तीला शनीच्या महादशेत (Shani Mahadasha) मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. चांगले कर्म करणाऱ्यांना ही वेळ कमी त्रासदायक ठरते.
Also Read:
शनीच्या गोचरचा या राशींवर होणार परिणाम
न्यायप्रिय असलेले शनी 23 एप्रिल 2022 रोजी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ राशी ही शनीचीच रस आहे. कुंभ राशीत शनीच्या प्रवेशानंतर तीन राशींना संकटांचा सामाना करावा लागेल. यात कुंभ, कर्क आणि वृश्चिक राशींचा समावेश आहे. यात कुंभ राशीवर शनीची साडेसाती तर कर्क आणि वृश्चिकवर शनी ढय्या सुरु होत आहे.
त्यानुसार कुंभ, कर्क आणि वृश्चिक राशींच्या जातकांना अडीच वर्षापर्यंत अडचणींचा सामना करावा लागणार आहे. यात शारीरिक, मानसिक, आर्थिक कष्ट सहन करावे लागतील. या काळात त्यांच्या प्रगतीत अडथळा निर्माण होत प्रत्येक कार्य पार पाडण्यासाठी कष्ट सहन करावे लागेल. यासह आर्थिकनुकसान होऊ शकते. कारण शनी आयु, रोग, पीडा, लोह, खनिज, सेवक आणि जल याचे कारक आहे. त्यामुळे या घटकांवर प्रभाव पडेल.
कुंभ राशीला सर्वाधिक त्रास
शनीचे हे गोचर कुंभ राशींच्या जाताकासाठी कठीण राहणार असून या राशीला सर्वाधिक त्रास सहन करावा लागणार आहे. कारण कुंभ राशीवर साडेसातीचा दुसरा चरण राहील. साडेसपातीचा दुसरा चरण सर्वात जास्त त्रासदायक ठरतो. तर दुसरीकडे ज्यांच्या कुंडलीत शनिची स्थिती चांगली आहे त्यांना शनी लाभ देखील प्रदान करतात.
हे उपाय कारतील शनीच्या प्रकोपापासून बचाव
– शनीची कृपा प्राप्त करण्यासाठी घरात शमीचे रोज लावून त्याची रोज पूजा करावी.
– शनी देवाची आराधना करावी. शक्य झाल्यास दररोज किंवा शनिवारी शनि चालिसाचे पठाण करावे.
– क्षमतेनुसार गरीब, निराधारांना दान द्यावे. यासह दिव्यांगांना मदत करावी यामुळे शनीकृपा प्राप्त होते.
– शनिवारी हनुमान चालिसाचे पठाण करावे.
– शनी मंदिर तसेच पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने शनीचा प्रकोप कमी होतो.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या