Pradosh Vrat 2022: प्रदोष व्रत केल्याने घरात नांदते सुख-समृद्धी, परत मिळते गेलेले वैभव

प्राचीन काळी एक ब्राह्मण महिला राहत होती. पतीच्या निधनानंतर ती भिक्षा मागून स्वतःचा उदरनिर्वाह करत होती. एके दिवशी ती भिक्षा मागून घरी परत येत असताना तिला वाटेत दोन दीन मुले दिसली.

Published: January 14, 2022 7:15 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Pradosh Vrat 2022: प्रदोष व्रत केल्याने घरात नांदते सुख-समृद्धी, परत मिळते गेलेले वैभव

प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीला (Triyodashi Tithi) प्रदोष व्रत (Pradosh Vrat) केले जाते. प्रदोष व्रत शिव शंकराला (Lord Shiva) समर्पित आहे. त्यामुळे हे व्रत करताना खूप काटेकोरपणे करावे लागते. या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते.  गेलेले वैभव परत मिळते. 15 जानेवारीला प्रदोष व्रत येत आहे. या दिवशी शनिवार आल्याने याला ‘शनि प्रदोष व्रत’ (Shani Pradeosh Vrat) असे देखील संबोधित केले जाते. ठ

Also Read:

या दिवशी भगवान शिवासोबत शनि देवाची देखील पूजा होत असते. हे व्रत केल्याने आयुष्यात कशाचीही कमी पडत नाही. चला जाणून घेऊया शनि प्रदोषची कथा आणि महत्त्व…

प्रदोष व्रत कथा (Pradosh Vrat Katha)

प्राचीन काळी एक ब्राह्मण महिला राहत होती. पतीच्या निधनानंतर ती भिक्षा मागून स्वतःचा उदरनिर्वाह करत होती. एके दिवशी ती भिक्षा मागून घरी परत येत असताना तिला वाटेत दोन दीन मुले दिसली. तिने दोघांना विचारपूस करून आपल्या घरी आणले. दोन्ही मुले मोठी झाल्यानंतर महिलेने त्यांना घेऊन शांडिल्य ऋषीच्या आश्रमात घेवून आली. तिथे शांडिल्य ऋषींनी आपल्या अंर्तज्ञानातून मुलांबाबत माहिती जाणून घेतली. शांडिल्य ऋषी म्हणाले, ‘हे देवी, ही दोन्ही मुले विदर्भ राजाचे राजकुमार आहेत. गंदर्भ नरेशच्या आक्रमणनंतर विदर्भ राजाचा राज-पाठ गेला. त्यामुळे या मुलांवर ही परिस्थिती ओढवली आहे.

शांडिल्य ऋषी यांनी सांगितल्याप्रमाणे, ब्राह्मण महिला आणि राजपुत्रांनी विधीपूर्वक प्रदोष व्रत केले. एके दिवशी थोरल्या राजकुमाराची भेट अंशुमतीसोबत झाली. दोघांमध्ये प्रेम फुलले. अंशुमतीच्या वडिलांनी होकार दिल्यानंतर राजकुमाराची तिच्याशी विवाह झाला. अंशुमतीच्या वडिलांच्या मदतीने दोन्ही राजकुमारांनी गंदर्भ नरेशवर हल्ला चढवला. गमावलेला राज-पाठ पुन्हा मिळवला. राजकुमारांना सिंहासन परत मिळाले. विशेष म्हणजे ब्राम्हण महिलेला देखील राजदरबारात खास स्थान देण्यात आले, ज्यामुळे त्यांचे सर्व दुःख संपले. प्रदोष व्रत केल्याने राजकुमारांनी गेलेले वैभव परत मिळाले. त्यांना मोठी संपत्ती मिळाली. त्याचे जीवन पुन्हा आनंदाने भरून गेले.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 14, 2022 7:15 PM IST