Shani rashi parivartan 2022: 'या' 7 राशींवर पडणार शनिदेवाची कृपादृष्टी तर 'या' राशींच्या राहावे लागेल सतर्क
ग्रहांमध्ये न्यायाधीश सूर्यपुत्र शनिदेव (shani dev) एप्रिल 2022 मध्ये राशी परिवर्तन करत आहे. त्यानुसार 28 एप्रिल 2022 रोजी सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी शनिदेव मकर राशीतून (makar rashi) कुंभ राशीत (kumbh rashi) प्रवेश करणार आहे. याचा परिणाम सर्वच राशीवर (zodiac signs) होणार आहे.

Shani rashi parivartan 2022: ग्रहांमध्ये न्यायाधीश सूर्यपुत्र शनिदेव (shani dev) एप्रिल 2022 मध्ये राशी परिवर्तन करत आहे. त्यानुसार 28 एप्रिल 2022 रोजी सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी शनिदेव मकर राशीतून (makar rashi) कुंभ राशीत (kumbh rashi) प्रवेश करणार आहे. याचा परिणाम सर्वच राशीवर (zodiac signs) होणार आहे. असे असले तरी 7 अशा राशी आहे ज्याच्यावर या राशी परिवर्तनाचा सर्वात जास्त परिणाम होईल. या राशीवर शनिदेवाची कृपादृष्टी राहणार असून त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहे ते जाणून घेऊ या.
Also Read:
- Horoscope Today: 23 डिसेंबर; तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती
- Horoscope Today: 22 डिसेंबर; कोणाची प्रगती होणार, कोणाला सावध राहण्याची गरज? जाणून घ्या आजचे राशीभविष्य
- Horoscope Today: 21 डिसेंबर; मीन राशीची मनातील इच्छा पूर्ण होईल, जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
शनिदेव मकर राशीत असल्यास चुकीचे काम करणाऱ्या जातकाला शिक्षा तर कुंभ राशीत आल्यावर चांगल्या कामाचे अधिक शुभ फळ देतात. शनिदेवाचे मकर राशीतील प्रवेशानंतर जगात अस्थिरता जाणवते. तर दुसरीकडे शनिदेव कुंभ राशीत आल्यास शुभ ग्रहांसोबत दृष्टी संबंध बनवीत चांगले फळ प्रदान करतात.
या राशींच्या जातकांची प्रतिष्ठा वाढते…
ज्योतिष शास्त्रानुसार शनीदेवाच्या कुंभ राशीत प्रवेशानंतर मेष, वृषभ, मिथुन, तूळ धनु, मकर आणि कुंभ राशीच्या जातकांची सामाजिक प्रतिष्ठा वाढत उत्पन्नात वाढ होते. तर दुसरीकडे कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक, मीन या राशीच्या जातकांनी सतर्क राहत कर्माकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
देशाचे वर्चस्व वाढेल…
स्वतंत्र भारताची कुंडली वृषभ लग्न आणि कर्क राशीची आहे. अशात सर्वात कारक ग्रहांच्या रूपात शनिदेव कार्य करतात. शनिदेव भाग्य भावातून राज्य भावात प्रवेश करणार असून हा प्रवेश आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाच्या दृष्टीने बघितल्यास सामाजिक पद प्रतिष्ठेसाठी खूप सुंदर आहे. आपल्या देशाचे वर्चस्व विश्वस्तरावर वाढणार आहे. इतर राष्ट्रांसोबत व्यपारी संबंध मजबूत होण्यासह लाभाची स्थिती देखील निर्माण होईल. यामुळे देशाच्या आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषात वाढ होत आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये देखील
देशाच्या वर्चस्वात वाढ होईल…
शनिदेवाच्या कुंभ राशी प्रवेशादरम्यान राहूचे देखील मेष राशीत प्रवेश होईल. शनी राहू यांचा तृतीय एकादश आणि केतू सोबत पंचम नवमचा संबंध होईल. अशात भूकंप, नैसर्गिक आपत्ती, आग अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता ज्योतिष शास्त्रात व्यक्त करण्यात आली आहे. या राशी परिवर्तनाचा सर्वसामान्य जनतेवर मोठा परिणाम होईल. 28 एप्रिल ते 4 जूनपर्यंत शनिदेव कुंभ राशीत मार्गी राहतील. तर 4 जून ते 12 जुलैपर्यंत वक्री होत कुंभ राशी प्रवेश करतील. पुन्हा 13 जुलै रोजी मकर राशीत प्रवेश करतील. अशा याप्रकारे शनिदेव 76 दिवसांपर्यंत कुंभ राशीत राहतील.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या