Top Recommended Stories

Shani Uday 2022: शनिदेवाचा 24 फेब्रुवारीला होणार उदय, या राशीच्या लोकांना मिळेल विशेष लाभ

गेल्या जानेवारी महिन्यात 22 तारखेला शनिदेवाचा (Shanidev) अस्त झाला होता. आता 24 फेब्रुवारीला शनिदेवाचा उदय होणार (Astrology Tips in Marathi) आहे. शनिदेवाच्या उदयाचा सर्वच 12 राशींवर प्रभाव जाणवणार आहे.

Updated: February 23, 2022 7:36 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

शनि गोचर 2023
शनि गोचर 2023

Shani Uday 2022: गेल्या जानेवारी महिन्यात 22 तारखेला शनिदेवाचा (Shanidev) अस्त झाला होता. आता 24 फेब्रुवारीला शनिदेवाचा उदय होणार (Astrology Tips in Marathi) आहे. शनिदेवाच्या उदयाचा सर्वच 12 राशींवर प्रभाव जाणवणार आहे. काही राशींसाठी शनिदेवाचा उदय शुभ तर काही राशींच्या लोकांसाठी अशुभ ठरणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, (Jyotish) सहा राशीच्या लोकांना शनि उदयाचा विशेष लाभ मिळाणार आहे.

Also Read:

मेष-(Aries)

शनि आपल्या राशीच्या दहाव्या घरात म्हणजेच कर्म स्थानी उदित होतील. तुमच्या राशीत मंगळ देव प्रारब्धाच्या स्थानी विराजमान आहे. त्यामुळे तुमच्या कुंडलीत राजयोग तयार होत आहे. या काळात राजकारणाशी संबंधित लोकांना मोठे पद मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळू शकते.

You may like to read

वृषभ-(Taurus)

शनि उदय तुमच्या जीवनात आनंद आणणार आहे व्यापार्‍यांना या काळात जास्त नफा होईल. तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल. तुम्ही कोणतेही काम कराल, त्यात यश मिळाल्याशिवाय राहाणार नाही.

कर्क- (Cancer)

शनि उदय तुमच्या राशीच्या सातव्या घरात म्हणजेच वैवाहिक जीवन, भागीदारीमध्ये होत आहे. या काळात तुम्हाला भागीदारीच्या कामात यश मिळेल. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल.

तूळ- (Libra)

तुमच्या राशीच्या चौथ्या भावात म्हणजेच सुख, वाहन आणि माता या स्थानात शनिचा उदय होत आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही चांगले काम कराल. व्यापाऱ्यांना फायदा होईल.

मकर- (Capricorn)

मकर राशीच्या लोकांच्या नशिबाच्या घरात बुध स्थित आहे. शनिच्या उदयाने तुमच्या कुंडलीत त्रिकोण राजयोग तयार होईल. या काळात व्यवसायात मोठी डील फायनल होऊ शकते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा फायदा तुम्हाला मिळेल.

कुंभ-(Aquarius)

शनिच्या उदयाचा कुंभ राशीच्या लोकांवर शुभ प्रभाव पडेल. शनीच्या अधिपत्याखाली असलेल्या या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कामात तुम्ही कौतुकास पात्र असाल.

(Disclaimer:या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे.)

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 23, 2022 5:56 PM IST

Updated Date: February 23, 2022 7:36 PM IST