Shanivar Che Upay : क्रोधीत शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय; लाभेल शुभ फळ
Shanivar Che Upay : न्यायदेवता शनिदेवाने (Shani Dev) 29 एप्रिल रोजी कुंभ राशीत (Kumbh Rashi) प्रवेश केला आहे. शनिचे हे राशी परिवर्तन (Shani Rashi privartan ) व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रभाव टाकतो.

Shanivar Che Upay : ज्योतिषशास्त्रात नवग्रहांमध्ये (Navgrah) प्रभावशाली ग्रह म्हणून शनि ग्रहाला (Shani Grah ) मान्यता आहे. पुराणात शनिदेवला सूर्यपुत्र तसेच न्याय देवता देखील म्हटले जाते. कठोर स्वभावाचे शनिदेव वाईट कर्म करणार्यांना दंड देतता. त्यामुळे शनिच्या साडेसातीमुळे लोकं खूप अडचणीत येतता. अशात शनिदेवाने (Shani Dev) 29 एप्रिल रोजी राशी पारिवर्तन (Shani Rashi Parivartan) केले आहे. शनिदेवाने कुंभ राशीत (Kumbh Rashi) प्रवेश केला आहे. शनिग्रह व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रभाव टाकतो. शनिची साडेसाती (Shani Sadesati) सुरु असल्यास व्यक्तीला जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत शनिचा सकारात्मक प्रभाव प्राप्त करण्यासाठी काही उपाया सांगाण्यात आले आहे. हे उपाय केल्यास क्रोधीत शनि प्रसन्न होत व्यक्तीला साकारात्मक फळ प्रदान करतात. चलातर मग जाणून घेऊया उपायांबद्दल सविस्तर माहिती.
Also Read:
शनिवारी करा हे सोपे उपाय
- शनिवारी लोखंड, काळी वस्तू, छत्री, उडदाची डाळ, चामड्याचे बूट आदींची खरेदी करू नये. अशी मान्यता आहे की, काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी केल्याने शनिचा अशुभ प्रभाव सुरू होतो.
- शनिवारी शनि मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. सोबत काळी उडदाची डाळ आणि काळे तीळ शनिदेवाला अर्पण करावे.
- शनिवारी गरीब व्यक्तिला दान तसेच गरजूला मदत केली पाहिजे. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होत शुभ फळ देतात.
- मंदिरात उपयोगात येणारी लोखंडी वस्तू शनिवारी मंदिरात दान करावी.
- शनिवारी सकाळी मोहरीच्या तेलाने मालीश करून स्नान करावे.
- शनिवारी गहू दळून त्यात काळे हरभरे मिसळावे. यामुळे शनिदेव अर्थिक समृध्दी प्रदान करतात.
- शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे शनिच्या अशुभ फळाचा प्रभव कमी होतो.
- काळ्या मुंग्यांना पीठ आणि साखर खाऊ घातल्याने शनिचा अशुभ प्रभाव समाप्त होतो.
- जे लोक शनिच्या साडेसातीमुळे त्रस्त आहेत, त्यांनी हनुमान चालीसाचे पठन करावे.
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या