Shattila Ekadashi 2022 Katha And Vrat Vidhi: आज 28 जानेवारी रोजी षट्तिला एकादशीचे व्रत आहे. माघ महिन्यातील (Magh Month) कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला षट्तिला एकादशीचे व्रत केले जाते. या दिवशी तीळ दान केल्याने पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. यासोबतच या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा करून षट्तिला एकादशी व्रत कथेचं (shattila ekadashi vrat katha) पाठण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. पौराणिक कथेनुसार नारदांनी भगवान विष्णूंना षट्तिला एकादशीची कथा आणि तिचे महत्त्व सांगण्याची विनंती केली होती. तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना षट्तिला एकादशीची कथा (shattila ekadashi katha) सांगितली. जाणून घेऊया षट्तिला एकादशीची कथा आणि व्रत विधी…
षट्तिला एकादशीच्या व्रताची कथा
एके काळी एका शहरात एक ब्राह्मणी राहत होती. ती भगवान श्रीहरी विष्णूची भक्त होती. ती भगवान विष्णूचे सर्व व्रत नियमानुसार करत असे. असेच एकदा तिने 1 महिना व्रत्त आणि उपवास केला. त्यामुळे तिचे शरीर दुर्बल झाले, पण तन शुद्ध झाले. आपल्या भक्ताला पाहून भगवंतांनी विचार केला की शरीर शुद्ध झाल्याने तिला बैकुंठ प्राप्त होईल, पण तिचे मन तृप्त होणार नाही. व्रतादरम्यान तिने एक चूक केली की तिने कधीही कोणाला दान दिले नाही. त्यामुळे तिला विष्णुलोकात समाधान मिळणार नाही. त्यानंतर प्रभू स्वत: तिच्याकडून दान घेण्यासाठी तिच्या घरी गेले.
जेव्हा प्रभू ब्राह्मणीच्या घरी भिक्षा घेण्यासाठी गेले तेव्हा तिने भगवान विष्णूला मातीचा एक गोळा दान केला. श्रीहरी तेथून निघून गेले. काही काळानंतर ब्राह्मणी मरण पावली आणि मृत्यूनंतर ती विष्णुलोकात पोहोचली. तिला राहण्यासाठी एक झोपडी मिळाली. या झोपडीत एका आंब्याच्या झाडाशिवाय काहीही नव्हते. तिने विचारले की इतके व्रत करून काय उपयोग? येथे एक रिकामी झोपडी आणि आंब्याचे झाडच मिळाले. तेव्हा श्रीहरी म्हणाले की तू मानवी जीवनात कधीही अन्न किंवा धन दान केले नाही. त्याचाच हा परिणाम आहे. हे ऐकून तिला पश्चात्ताप होऊ लागला. तिने परमेश्वराकडे उपाय मागितला.
Trending Now
तेव्हा भगवान विष्णू म्हणाले की जेव्हा देव कन्या तुला भेटायला येतील तेव्हा तू त्यांना षट्तिला एकादशीच्या व्रताचे विधी विचारावे. त्यांनी त्याबद्दल सांगेपर्यंत तुम्ही झोपडीचे दार उघडू नको. ब्राह्मणीने भगवान विष्णूच्या सांगण्यानुसार तसे केले. देव कन्येकडून विधी जाणून घेतल्यानंतर तिने षट्तिला एकादशीचे व्रतही केले. त्या व्रताच्या प्रभावामुळं तिची झोपडी सर्व आवश्यक वस्तू, पैसा, धान्य इत्यादींनी भरून गेली. तीही रूपवती झाली. भगवान विष्णूंनी अशा प्रकारे षट्तिला एकादशी व्रताचा महिमा नारदजींना सांगितला. षट्तिला एकादशीच्या दिवशी तीळ दान केल्याने सौभाग्य वाढते आणि दारिद्र्य दूर होते.
षट्तिला एकादशी व्रत विधी (Shattila Ekadashi Vrat Vidhi)
षट्तिला एकादशीच्या दिवशी स्नान करावे. स्वच्छ कपडे परिदान करावे. श्री हरी विष्णूचे स्मरण करून व्रताचे व्रताचा संकल्प करावा. घरातील मंदिरात श्री हरी विष्णूच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर दिवा लावावा. भगवान विष्णूच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला वस्त्र घाला. प्रसाद व फळं अर्पण करा. षट्तिला एकादशीच्या दिवशी काळ्या तीळाच्या दानाला खूप महत्त्व आहे. पंचामृतात तीळ मिसळून भगवान विष्णूंना स्नान घाला. हे व्रत केल्याने आरोग्य प्राप्त होते. अन्न, तीळ इत्यादी दान केल्याने धन-धान्यात वृद्धी होते. धूप-दीप करून विधीवत देवाची पूजा, आरती करावी. दिवसभर उपवास ठेवा. संध्याकाळी कथा ऐकून फलाहार करावा आणि रात्री जागरण करावे.