Top Recommended Stories

श्रावण महिन्याच्या शुभेच्छा मराठीमध्ये | Shravan Month Wishes In Marathi

Shravan Month Wishes In Marathi: श्रावण महिन्याला खूपच पवित्र महिना मानण्यात आले आहे. श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा मोठ्या भक्तीभावाने केली जाते. अशा या पवित्र श्रावण महिन्यानिमित्त सर्वजण आपल्या जवळच्या नातेवाईक, मित्र परिवार त्याचसोबत कुटुंबातील सदस्यांना शुभेच्छा देतात.

Published: July 29, 2022 3:00 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

भगवान शंकर
भगवान शंकर

Shravan Month Wishes In Marathi : महाराष्ट्रात श्रावण महिन्याला (Shravan Months) 29 जुलैपासून म्हणजेच शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. श्रावण महिना (Shravan 2022) हा हिंदू धर्मियांसाठी खूपच खास असतो. श्रावण महिन्याला खूपच पवित्र महिना मानण्यात आले आहे. भगवान शंकराने (Bhagwan Shankar) समुद्रमंथनातून बाहेर पडलेले विष प्राशन करून मनुष्य जातीवरील संकट दूर केले त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी विशेष व्रत केले जाते. श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा मोठ्या भक्तीभावाने केली जाते. अशा या पवित्र श्रावण महिन्यानिमित्त सर्वजण आपल्या जवळच्या नातेवाईक, मित्र परिवार त्याचसोबत कुटुंबातील सदस्यांना शुभेच्छा देतात. तुम्ही सुद्धा श्रावण महिन्यानिमित्त आपल्या जवळच्या व्यक्तींना मराठीमध्ये (Shravan Month Wishes In Marathi) खास शुभेच्छा देऊ शकता….

निसर्ग आलाय बहरून,
मनही आलंय मोहरून,
रंगात तुझ्या नहाण्या,
मन होई पाखरू पाखरू
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

You may like to read


कोवळ्या उन्हासोबदत आलेली अलगद श्रावणसर
अवखळ वाऱ्याची अल्लडशी लहर
पानाफुलांना फुटलेला अनोखा बहर
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!


पावसाने भिजून जाई अवखळसा किनारा
श्रावणाच्या चाहुलीने हर्षे निसर्ग सारा
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!


येण्याने तुझ्या मन येई मोहरून,
देही जाई शहारून,
सरींनी या मन होई चिंब चिंब,
श्रावण येई असा बरसून
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा


बेभान मुक्त वारा केसांशी खेळून मला लाजवेल
श्रावण सरींनी बहरून बेधुंदपणे त्यात रमेल
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!


रंग रंगात रंगला श्रावण,
नभ नभात उतरला श्रावण,
पानापानात लपला श्रावण,
फुलाफुलांत उमलला श्रावण
श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा!


श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सर सर शिरवे
क्षणात फिरूनी ऊन पडे
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!


आजपासून सुरू होणारा श्रावण महिना
आणि श्रावणी सोमवारांचे व्रत तुमच्या आयुष्यात
सुख, समृद्धी, भरभरा घेऊन येवो हीच सदिच्छा
श्रावणी महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा!


सणासुदीची घेऊन उधळण,
आला रे आला हसरा श्रावण!
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!


परंपरेचे करूया जतन,
आला आहे श्रावण,
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!


आनंद माझ्या मनात माईना,
सृष्टी सजली बदलली दृष्टी,
घेऊन सरींवर सरी आला तो माझ्या अंगणी
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!


कर्तव्य आणि नात्यांची देतो आठवण
करून ठेवतो कायमची साठवण
असा हा तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका महिना श्रावण
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!


ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.