
हिंदी दिनानिमित्त मराठीतून द्या शुभेच्छा - Hindi Diwas Wishes Quotes in Marathi
Shravan Somvar Marathi Shubhechha Sandhesh Wishes, message, status, quotes : श्रावण महिना शिवभक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. यंदा 29 जुलैपासून श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावणात प्रत्येक शिवभक्त शिवप्रभूंना प्रसन्न करण्यासाठी सोमवारची वाट पाहतो. यंदा श्रावणात चार सोमवार येत आहे. श्रावण सोमवारी शिवप्रभूंची पूजा केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, दुःख दारिद्रय दूर होते अशी धार्मिक मान्यता आहे. शिवभक्त प्रत्येक सोमवारी व्रत, रुद्राभिषेक, कावड यात्रा आणि मंत्रांचा जप करून भगवान शिवप्रभूंना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. या उद्या 1 ऑगस्ट रोजी पहिला श्रावण सोमवार आहे. यानिमित्ताने तुम्ही नातेवाईकांना आणि मित्रांना श्रावण सोमवारच्या शुभेच्छा देऊ शकता. येथे खाली आम्ही तुम्हाला काही शुभेच्छा संदेश देत आहोत. हे तुम्ही जवळच्या लोकांना पाठवून त्यांना श्रावण सोमवारच्या शुभेच्छा देऊ शकता.
शिव हेच सत्य, शिव हेच सुंदर,
शिव हेच अनंत, शिव हेच ब्रम्ह,
शिव हेच शक्ती, शिव हेच भक्ती,
श्रावण सोमवारच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा,
वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा
लावण्य सुंदर मस्तकी बाळा,
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा
श्रावणी सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
श्रावण मासाला झाला प्रारंभ, करू शिवाच्या पूजेला आरंभ
ठेऊ शिवाचे व्रत, होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्ण
श्रावण सोमवारच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
एक पुष्प, एक बेलपत्र, एक तांब्या पाण्याची धार,
भोळे शिवप्रभू करतील सर्वांचा उध्दार,
श्रावण सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
देवी दैत्यी सागरमंथन पै केले,
त्यामाजी अवचित हळहळ जे उठले
ते त्वा असुरपणे प्राशन केले,
नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले,
श्रावण सोमवारच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
कैलासराणा शिव चंद्रागौळी,
फणीद्रं माथा मुकुटी झळाळी
कारुण्यसिंधु भवदुःखहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
महादेवाला करू वंदन वाहू बेलाचे पान
महादेवा सदैव सुखी ठेव माझ्या प्रियजनांना
श्रावणी सोमवारच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
श्रावण मास होता सुरु, शिवशंकराची पूजा करू
शंकराचा तुमच्यावर आशीर्वाद राहो या सदिच्छा
श्रावणी सोमवारच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबाला खूप खूप शुभेच्छा!
दुःख दारिद्रय नष्ट होवो, सुख समृद्धी दारी येवो
या श्रावण सोमवारच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व
मनोकामना पुर्ण होवो.
श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा!
गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, लाविले भस्म कपाळा,
आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा,
श्रावण सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
ॐ मध्ये आहे आस्था, ॐ मध्ये विश्वास,
ॐ मध्ये आहे शक्ती, ॐ मध्ये सर्व संसार,
ॐ ने करा दिवसाची चांगली सुरूवात,
श्रावणी सोमवारच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!
शिव सत्य आहे शिव सुंदर आहे
शिव अनंत आहे शिव ब्रम्ह आहे,
शिव शक्ती आहे,शिव भक्ती आहे
श्रावणी सोमवारच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
Shravan Somvar 2022 , Shravan Somvar Shubhechha, Shravan Somvar Shubhechha in Marathi, Shravan Somvara Good Wishes, Shravan Somvara Wishes Marathi, Shravan Somvar 2022 Wishes In Marathi, Shravan somvar wishes, message, status, quotes,sms, images,
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या
Enroll for our free updates