By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Shravan Special Recipe : श्रावणात उपवास करताय?, मग झटपट तयार करा उपवासाचे काप!
Shravan Special Recipe : श्रावणी सोमवारनिमित्त (Shravan Somvar fasting) उपवास ठेवून भगवान शंकराची भक्ती भावाने पूजा केली जाते. श्रावण सोमवारनिमित्त तुमचा देखील उपवास असेल तर तुम्ही घरीच झटपट उपवासाचे काप (Upvasache Kaap) तयार करु शकता.

Shravan Special Recipe : श्रावण महिन्याला (Shravan Month) सुरुवात झाली आहे. श्रावण महिन्याला (Shravan Month 2022) खूपच पवित्र महिना मानला जातो. हा महिना अनेक व्रत – वैकल्याचा महिना आहे. या महिन्यामध्ये अनेक जण उपवास करतात. श्रावणी सोमवारनिमित्त (Shravan Somvar fasting) उपवास ठेवून भगवान शंकराची भक्ती भावाने पूजा केली जाते. श्रावण सोमवारनिमित्त तुमचा देखील उपवास असेल तर तुम्ही घरीच झटपट उपवासाचे काप (Upvasache Kaap) तयार करु शकता. अगदी सोपी आणि कमी साहित्यामध्ये होणारी ही रेसिपी (Shravan Special Recipe ) आहे. हे उपवासाचे काप कसे तयार करायचे हे आज आपण जाणून घेणार आहोत…
उपवासाचे काप तयार करण्यासाठी लागणारे साहित्य –
– सुरण
– कच्ची केळी
– राजगिऱ्याचे पीठ
– उपवासाचे मीठ
– लाल तिखट
असे तयार करा सुरणाचे काप –
सुरणाचे काप तयार करण्यासाठी सर्वात आधी हाताला तेल लावून चाकूच्या सहाय्याने सुरणाचे काप करुन घ्यायचे आहेत. हे काप आपल्याला जास्त जाड किंवा जास्त पातळ करायचे नाही. मिडियम स्वरुपाचे हे सुरणाचे काप करायचे आहे. सुरण खाल्ल्याने बऱ्याचदा घशाला खाज आल्यासारखे वाटते. त्यासाठी आपल्याला सुरणाच्या कापाला चिंचेचा कोळ लावायचा आहे. आता एका ताटामध्ये राजगिऱ्याचे पीठ घ्या, त्यामध्ये थोडे लाल तिखट आणि उपवासाचे मीठ टाकून हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करुन घ्यायचे आहे. आता गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये थोडे तेल टाका. त्यानंतर सुरणाचे एकएक काप घेऊन त्याला राजगिऱ्याच्या पीठाचे व्यवस्थित कोट करुन घ्या. त्यानंतर पॅनमध्ये एक एक काप ठेवून दोन्ही बाजूने मंद आचेवर व्यवस्थित फ्राय करुन घ्या. हे सुरणाचे काप फ्राय करत असताना पॅनवर तुम्ही झाकण ठेवू शकता. यामुळे सुरणाचे काप खूपच लवकर शिजतात आणि कुरकुरीत होतात. सुरणाचे काप खायला खूपच चविष्ट लागतात.
असे तयार करा केळीचे काप –
कच्च्या केळीचे काप तयार करण्यासाठी केळी कापण्यापूर्वी हाताला तेल लावा. केळीला असलेला चिक हाताला लागल्याने आपले हात काळे होतात. कच्ची केळी व्यवस्थित सोलून घ्या आणि त्याचे मध्यम काप तयार करुन घ्या. हे काप तुम्ही पाण्यामध्ये ठेवा. कारण केळी कापल्यानंतर लगेचच काळी पडते. आता एका ताटामध्ये राजगिऱ्याचे पीठ घ्या, त्यामध्ये थोडे लाल तिखट आणि उपवासाचे मीठ टाकून हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करुन घ्या. आता गॅसवर पॅन ठेवून त्यावर थोडे तेल टाका. आता केळीच्या कापांना राजगिऱ्याचा कोट करुन पॅनवर एकएक काप ठेवून व्यवस्थित फ्राय करुन घ्या. अशापद्धतीने आपले केळीचे काप तयार होतील. हे केळीचे काप उपवासाला खायला खूपच चविष्ट लागतात.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या