मुंबई : हिंदू धर्मात श्रावण महिन्याला (Shrawan Month) विशेष महत्त्व आहे. 9 ऑगस्टपासून श्रावण (Shrawan 2021) महिना सुरू होणार आहे. या महिन्यात लोकं महादेवाचे व्रत करतात. अविवाहित मुली इच्छित वर प्राप्तीसाठी सोमवारी भगवान शंकराचे उपवास करतात. त्याचबरोबर विवाहित महिला आपल्या पतीच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुषीसाठी श्रावणात उपवास करतात. त्यामुळे तुम्ही देखील श्रावणात महादेवाचे व्रत करणार असाल तर काही नियम (Shrawan 2021 Special Tips) माहित असणे आवश्यक आहे… (Shrawan Month Pooja Tips Women should keep these things in mind while worshiping Mahadev in the month of Shravan)Also Read - Shrawan Somvar 2022: तरुणींनी शिवलिंगाला करू नये स्‍पर्श, जाणून घ्या काय आहे कारण

  1. शिवलिंगाचा स्पर्श केल्यावर माता पार्वती क्रोधीत होते त्यामुळे स्त्रियांना शिवलिंगास स्पर्श करण्यास मनाई असते. याचा अर्थ स्त्रिया शिवलिंगाची पूजा करू शकत नाहीत असे नाही. स्त्रिया महादेवाची पूजा करू शकतात.
  2. स्त्रियांनी आपले केस उघडे ठेवू नये कारण यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. शास्त्रामध्येही असे सांगितले आहे की लग्नाच्या वेळी माता सीतेच्या आईने त्यांना नेहमीच आपले केस बांधून ठेवण्यास सांगितले होते. बांधलेले केस नात्यांनाही बांधून ठेवतात, अशी मान्यता आहे.
  3. भगवान शंकराला हळद लावणे अशुभ मानले जाते. पूजेमध्ये महादेवाला भांग, धोत्रा, बेलपत्र, पांढरे फुलं, मध, फळं इत्यादी अर्पण करावे.
  4. श्रावण महिन्यात चुकूनही दारू, मांस-मासे यांचे सेवन करू नये. या महिन्यात आले, मुळा, वांगे, लसूण, कढीपत्ता, मिरपूड आणि कांदा खाण्यास निषिद्ध मानले जाते. कारण भगवान शंकराला हे मुळीच पसंत नाहीत.
  5. मासिक पाळीच्या वेळी महिलांनी शिवलिंगाची पूजा करू नये कारण असे करणे निषिद्ध मानले जाते.
  6. ज्यांनी उपवास ठेवले आहेत त्यांनी काळे कपडे घालू नयेत. यामुळे नकारात्मक उर्जा वाढते.
Also Read - Somvar Pooja Tips: शिवलिंगाला हळद लावणे मानले जाते अशुभ, अशी करा श्रावण सोमवारची पूजा

Also Read - Pahila Shrawan Somvar 2022: कधी आहे पहिला श्रावण सोमवार; महादेवाची पूजा करताना घ्या ही काळजी