मुंबई : श्रावण महिना (Shrawan 2021) 9 ऑगस्टपासून सुरू होणार असून 06 सप्टेंबर 2021 रोजी संपेल. हिंदू कॅलेंडरचा हा पाचवा महिना आहे. श्रावण महिन्याला (Shrawan Month) धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. शिवभक्तांसाठी श्रावण महिना हा सर्वात पवित्र मानला जातो. हा महिना भगवान शंकराच्या उपासनेसाठी खूप चांगला मानला जातो. राशीनुसार श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा (Shrawanat Rashinusar kara puja) करून तुम्ही तुमच्या कुंडलीमध्ये असलेल्या ग्रहांचा नकारात्मक प्रभाव कमी करू शकता.Also Read - Janmashtami 2021: जन्माष्टमीला राशीनुसार श्री कृष्णाला अर्पण करा वस्त्र आणि नैवद्य, आयुष्यात येईल सुख आणि आनंद

मेष: (Aries Pooja In Shrawan)

श्रावण महिन्यात मेष राशीच्या लोकांनी भगवान शंकराची पुजा करताना नागेश्वराय नमः मंत्राचा जप करावा. Also Read - Shrawan Month Pooja Tips: श्रावणात महादेवाची पूजा करताना स्त्रियांनी आपले केस मोकळे ठेवू नये कारण...

वृषभ: (Taurus Pooja In Shrawan)

श्रावण महिन्यात वृषभ राशीचे लोक चमेलीची फुलं वाहून भगवान शंकराची पूजा करू शकतात. यासोबतच रुद्राष्टकचे पठन करावे. Also Read - Shrawan Month: तरुणींनी शिवलिंगाला स्‍पर्श करण्याची चूक करू नये, अन्यथा...

मिथुन: (Gemini Pooja In Shrawan)

श्रावण महिन्यात मिथुन राशीच्या लोकांनी भगवान शंकराला धोत्रा, भांग अर्पण करावा. यासोबतच ओम नमः शिवायचा जप करावा.

कर्क: (Cancer Pooja In Shrawan)

श्रावण महिन्यात कर्क राशीच्या लोकांनी भांग मिश्रित दुधाने शिवलिंगाचा अभिषेक करावा. यासोबतच रुद्राष्टक पठन करा.

सिंह: (Leo Pooja In Shrawan)

श्रावण महिन्यात सिंह राशीच्या लोकांनी भगवान शंकराला लाल रंगाची फुले अर्पण करावीत आणि शिव चालीसाचे पठन करावे.

कन्या: (Virgo Pooja In Shrawan)

श्रावण महिन्यात कन्या राशीच्या लोकांनी शिवलिंगाच्या पूजेमध्ये बेलपत्र, धोत्रा, भांग इत्यादी साहित्य अर्पण करावे.

तूळ: (Libra Pooja In Shrawan)

श्रावण महिन्यात तूळ राशीच्या लोकांनी मिश्री युक्त दुधाने शिवलिंगाचा अभिषेक करावा. तसेच भगवान शंकराच्या सहस्त्रनामांचा जप करावा.

वृश्चिक: (Scorpio Pooja In Shrawan)

श्रावण महिन्यात वृश्चिक राशीच्या लोकांनी गुलाबाची फुले वाहून भगवान शंकराची पूजा करावी. तसेच रोज रुद्राष्टक पठन करावे.

धनु: (Sagittarius Pooja In Shrawan)

श्रावण महिन्यात धनु राशीच्या लोकांनी पहाटे लवकर उठून पिवळ्या फुलांनी भगवान शंकराची पूजा करावी. भगवान शंकराला प्रसाद म्हणून खीर अर्पण करा.

मकर: (Capricorn Pooja In Shrawan)

श्रावण महिन्यात मकर राशीच्या लोकांनी धोत्रा, भांग, अष्टगंध इत्यादींनी भगवान शंकराची पूजा करावी. यासह पार्वतीनाथाय नम: या मंत्राचा जप करावा.

कुंभ: (Aquarius Pooja In Shrawan)

श्रावण महिन्यात मकर राशीच्या लोकांनी उसाच्या रसाने शिवलिंगाचा अभिषेक करावा. यासोबतच शिवाष्टक पठन करावे.

मीन: (Pisces Pooja In Shrawan)

श्रावण महिन्यात मीन राशीच्या लोकांनी शिवलिंगावर पंचामृत, दही, दूध आणि पिवळी फुले अर्पण करावीत. यासोबतच पंचाक्षरी मंत्र नमः शिवायचा 108 वेळा चंदनाच्या माळेने जप करावा.