
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Shukrawar Che Upay : हिंदु धर्मात (Hindu Dharma) शुक्रवारचा दिवस महालक्ष्मीला समर्पित आहे. मान्यतेनुसार शुक्रवारी माता लक्ष्मीची विधीवत पूजा (Mata Lakshmi Puja Vidhi) केल्यास व्यक्तीच्या जीवनातील अडचणी दूर होतात. या दिवशी काही उपाय (Friday Remedy) करणे देखील खूप फायदेशीर ठरतात.
तुम्ही आर्थिक समस्येतून जात असल्यास महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी (Shukrawar Upay) काही उपाय केले जातात. हे उपाय केल्याने महालक्ष्मीची (Mata Lakshmi) कृपा लाभते. घरात सुख-समृद्धी नांदते. कशाचीही कमतरता भासत नाही.
महालक्ष्मीची आरती करताना 4 कापूरच्या वडी आणि 3 लवंग घ्या. कापूर पेटवून त्यावर लवंग ठेवा. त्यानंतर महालक्ष्मीची आरती करा. असे केल्याने घरातील नकारात्मक शक्ती नाहीसी होते.घरात सुख-शांती नांदते. या सोप्या उपायाने महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते.
महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही शुक्रवारचे व्रत देखील करू शकतात. व्रतासोबत माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवा. यासह 6 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींना प्रसाद म्हणून खीर द्यावी. सोबत लहान मुलींना फळं देखील दान कारू शकतात.सतत 21 दिवस हा उपाय करावा. यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होत कर्जातून देखील सुटका होते.
महालक्ष्मीच्या पूजेत कमळ किंवा गुलाबाचे फूल अर्पण करावे. माता लक्ष्मीला हे फूल अत्यंत प्रिय आहे. पूजेदरम्यान माता लक्ष्मीच्या चरणात फूल अर्पण करावे. यामुळे घरात सुख-शांती नांदते. सोबत व्यक्तीच्या प्रगतीचे योग देखील बनतात.
आर्थिक चणचण भासत असेल तर शुक्रवारी माता लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर 11 दिवस अखंड ज्योत लावावी. त्यानंतर 11 कन्येला भोजन द्या. असे केल्याने पैशासंबंधी समस्या दूर होते.
शुक्रवारी शंखामध्ये जल भरून भगवान विष्णूचा अभिषेक केला करावा. अभिषेक केल्याने महालक्ष्मी लवकर प्रसन्न होते. या उपायामुळे पैशांसंबंधी समस्या सुटते. यासह धनप्राप्तीसाठी प्रत्येक शुक्रवारी महालक्ष्मीला सफेद रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा.
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या