मुंबई : आपण सुंदर दिसावे (Look Beauty) आणि आपले तारुण्य आबाधित राहवं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यासाठी तुम्ही बरेच प्रयत्न करत असाल. मग त्यासाठी डाएट करणं (Dieting) असो किंवा वेगवेगळ्या कॉस्मेटिक प्रोडक्टचा (cosmetic products) वापर करणं असो. पण बऱ्याचदा वेगवेगळ्या कॉस्मेटिक प्रोडक्टचा वापर करुन काही फायदा होत नाही. त्यासाठी तुम्हाला योग्य आहार घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे.Also Read - Leftover Rice Face Pack: रात्री शिल्लक राहिलेला भात फेकून देताय?, त्याचा फेसपॅक वाढवेल तुमचे सौंदर्य!

सलाडचे सेवन (Consumption of salads) जवळजवळ प्रत्येकाचा घरामध्ये केले जाते. सलाडमध्ये (Salad) कोथिंबिर (Coriander), टोमॅटो (tomato), कांदा (Onion) आणि बीटरुटचा (beetroot) समावेश केला जातो. सलाड आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर (beneficial for health ) आहे. सलाडमध्ये असलेले टोमॅटो आपल्या आरोग्यासाठी त्याचसोबत त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. रोज सलाडमध्ये दोन टोमॅटो खाल्ले तर तुमचे सौंदर्य वाढेल त्याचसोबत तुमचे तारुण्य आबाधित राहित. आज आम्ही तुम्हाला टोमॅटोच्या फायद्यांविषयी सांगणार आहोत… Also Read - Multani Mati Health Benefits: त्वचेसोबतच आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे मुलतानी माती; जाणून घ्या फायदे

त्वचेच्या कॅन्सरपासून बचाव (Prevention of skin cancer) –

टोमॅटोमध्ये लाइकोपीन भरपूर प्रमाणात असते. लाइकोपीन आपल्या त्वचेचे कॅन्सरपासून संरक्षण करते. अशा परिस्थितीत दररोज टोमॅटो खाल्ल्याने त्वचेच्या कॅन्सरचा धोका कमी होतो. Also Read - Shocking: पेनिसची लांबी मोजण्यासाठी मुलानं गुप्तांगात घातली USB Cable,नंतर झालं असं...

वृध्दत्व विरोधी (Anti aging) –

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी सोबतच व्हिटॅमिन ए आणि बी मोठ्याप्रमाणात आढळते. टोमॅटोचे दररोज सेवन केल्यामुळे त्वचेत कोलेजनचे प्रमाण वाढते. कोलेजन त्वचेसाठी आवश्यक प्रोटीन आहे. ज्यामुळे त्वचा तंदुरुस्त राहते. टोमॅटो खाल्ल्याने वृद्धत्वाचा परिणाम त्वेचेवर कमी प्रमाणात दिसून येतो.

सूज येण्यापासून बचाव (Prevent swelling)-

दररोज टोमॅटोचे सेवन केल्यामुळे आपल्या त्वचेला अंतर्गत सूज येण्यापासून बचाव होतो. यामुळे त्वचेच्या पेशींना जे अँटी-इफ्लेशन गुणधर्म मिळतात त्यामुळे त्वचेवरील सूज दूर होते. तुमची त्वचा वरुन देखील तितकीच मऊ दिसून येते.